मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कॅप्टन सुनील डोबाळे होते. कोरोनाच्या संकट काळात मध्यस्थीच्या या उपक्रमाला राज्यभरातून विवाह इच्छुक ३१४ युवक-युवतींनी या मेळाव्यात सहभागी होत परिचय दिला. या माध्यमातून मुला-मुलींचे विवाहयोग जुळवून येतील, असा विश्वास फोकमारे यांनी व्यक्त करून मध्यस्थी पुणे टीमचे त्यांनी अभिनंदन केले. संत वासुदेव महाराज ज्ञानपीठाचे विश्वस्त नंदकिशोर हिंगणकर यांनीही समयोचित मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात कॅप्टन डोबाळे यांनी मार्गदर्शन केले. प्रख्यात कवी निलेश म्हसाये यांनी मेळाव्याचे सूत्रसंचालन, तर वैभव टेकाळे यांनी आभार मानले. पुणे विभागीय शाखेचे सर्वश्री महादेवराव सावरकर, दीपक धुमाळे, संतोष माळी, मोहन डोंगरे, रामदेव शेळके, नितीन सावरकर, अनिरुद्ध काळे, अभय तारक, अतुल गावंडे यांनी मेळाव्याच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
राज्यस्तरीय ऑनलाइन वधू-वर परिचय मेळाव्याला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2021 4:09 AM