अकोट : येथील अंजनगाव मार्गावरील श्री संत गजानन महाराज मंदिरात लसीकरण शिबिराचे नागरी आरोग्य केंद्र व श्री संत गजानन महाराज मंदिर यांच्या वतीने दि. २० व २१ सप्टेंबर रोजी आयोजन केले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दोन दिवसांत ५०० च्या वर नागरिकांना लसीचा डोस देण्यात आला आहे.
या शिबिराच्या आयोजनासाठी नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजयश्री गुल्हाने यांनी सहकार्य केले. शिबिरामध्ये कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लस उपलब्ध होत्या. या लसीकरण मोहिमेसाठी नागरी आरोग्य केंद्र गोलबाजारच्या वंदना मेहरे, माधुरी वानखडे, साधना जामोदकर, सरिता गडम, दीपक भटकर, अमोल इंगोले, दीपक बोडखे, चेतन भगत, सिद्धांत वानखडे, सुशील सावरकर, संजय शेळके आदींनी परिश्रम घेतले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून ॲड. ब्रिजमोहन गांधी, पुरुषोत्तम चौखंडे, प्रदीप खोटरे, डॉ. गजानन महल्ले, नीलेश चंदन, रमेश भालतिलक, भगवान टेकाडे, प्रशांत सिरसाट आदी उपस्थित होते.