हिरपुर आरोग्यवर्धिनी उपकेंद्रामध्ये यापूर्वी ४१२ ग्रामस्थांनी लसीकरण करून घेतले. २६ एप्रिलला हिरपूर, सांजापूर, ब्रह्मी जितापूर, खेडकर व खापरवाडा येथील नागरिकांनी लसीकरणाला गर्दी केली होती. सोमवारी २१७ नागरिकांनी लसीकरण करून घेतले. यावेळेस पंचायत समिती गटविकास अधिकारी बायस, तालुका आरोग्य अधिकारी करडे, विस्तार अधिकारी कीर्तने, फासे यांनी लसीकरण स्थळी भेट देऊन ग्रामस्थांना सुरक्षित अंतर ठेवण्याचे सांगून लसीकरणाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले व लसीकरण हाच कोरोनापासून आपल्याला सुरक्षित ठेवू शकते. त्याकरिता इतरांनी सुद्धा लसीकरण करून घ्यावे. लसीकरणाचा आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही, असे सांगितले. लसीकरण यशस्वी होण्याकरिता आरोग्यसेवक मुळे,आरोग्य सहायक सोनकुसरे, जोगळे, खेडकर, अंगणवाडी सेविका आशावर्कर, पंकज चौढाळे, नितीन वसू, ग्रामसेवक संदीप हेगंड यांनी परिश्रम घेतले.
हिरपूर आरोग्य उपकेंद्रात लसीकरणाला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 4:19 AM