कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारतर्फे कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आले. या मोहिमेंतर्गत तेल्हारा तालुक्यातील इसापूर येथे लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते. या शिबारात इसापूर येथील जवळपास ८० जणांनी लस घेतली. जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, यासाठी सरपंच मीरा बोदडे यांनी जनजागृती करीत पुढाकार घेतला. यावेळी उपसरपंच ग्रामपंचायत इसापूर महादेवराव नागे यांना लस घेऊन जनजागृती केली. यावेळी पत्रकार आनंद बोदडे, खंडूजी घाटोळ, आशा सेविका अर्चना मोरे यांनी घरोघरी जाऊन लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी वैद्यकीय अधिकारी योगेश प्रभे, आरोग्य सेविका जी. एस. राहाटे, गवई, आशा वर्कर रंजना भोजने, शीला भोजने, भारती नागे, संगणक चालक नाईकवाडे आदी उपस्थित होते.
---------------
गावात शंभर टक्के लसीकरण होण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्या प्रमाणे कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यासाठी वयाची अट नाही, त्याच प्रमाणे सरपंच, उपसपंच व सदस्यांकरिता अट शिथिल करावी. नागरिकांनी भीती न बाळगता लसीकरण करून घ्यावे.
- मीरा आनंद बोदडे, सरपंच, ग्रा. पं. इसापूर.