अकोला : कोविड पॉझिटिव्हिटी कमी असणाऱ्या राज्यातील २५ जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल केले असून त्यामध्ये अकोल्याचाही समावेश आहे. बाजारपेठ खुली ठेवण्याची वेळ रात्री आठपर्यंत वाढविण्यात आली असली तरी शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंतच बाजार खुला राहील. मात्र रविवारी बाजारपेठ पूर्णत: बंद राहणार आहे. ब्रेक द चैनअंतर्गत निर्बंध माेठ्या प्रमाणात खुले झाले असले तरी सर्व प्रकारची धार्मिक स्थळे बंदच राहणार आहेत.
अकाेल्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यातील कोविड रुग्णसंख्या वाढीची गती मंदावली होती. कोरोना रुग्णसंख्या वाढ नियंत्रणात असतानाच गुरुवारी राज्याचे आरोग्य मंत्री यांनी पॉझिटिव्हिटी रेट कमी असणाऱ्या २५ जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल केले जाणार असल्याचे संकेत शासनाने दिले हाेते. यामध्ये अकोला जिल्ह्याचाही समावेश आहे. त्यामुळे अकोलेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. रुग्णालयात दाखल ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही लक्षणीय घटली आहे. नव्या निर्णयानुसार, अकोल्यातील बाजारपेठ रविवार वगळता उर्वरित दिवस रात्री आठ वाजतापर्यंत आणि शनिवारी दुपारी ३ पर्यंत नियमित सुरू राहणार आहे. त्यामुळे अकोलेकरांना विशेषत: व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हे निर्बंध होणार शिथिल
सर्व शासकीय कार्यालय पूर्ण क्षमतेनुसार सुरू ठेवण्याची मुभा राहील.
हाॅटेल, रेस्टॉरंट, सिनेमागृह आदींना अटींचे पालन करून ५० टक्के क्षमतेने मुभा
जिम, सलून, ब्यूटी पार्लर ५० टक्के क्षमतेने सुरू
मैदाने, बगीचे व्यायाम तसेच सायकलिंगसाठी खुले
हे बंदच
सर्व प्रकाराची धार्मिक स्थळे
सिनेमागृह, नाट्यगृह
राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम, माेर्चे यांना परवानगी नाही
.
कोरोना नियंत्रित, मात्र संकट कायम
जिल्ह्यात कोविड रुग्णसंख्या वाढ नियंत्रणात आहे, मात्र कोरोनाचे पूर्णत: निर्मूलन झाले नाही. त्यामुळे अकोलेकरांवर अद्यापही कोविडचे संकट कायम आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.
हे राहणार नियमित सुरू
अत्यावश्यक दुकाने, अत्यावश्यक नसलेली दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.
रेस्टॉरंट दुपारी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने चालू राहतील. त्यानंतर घरपोच सेवा सुरू राहील.
जिम, सलून, ब्यूटी पार्लर ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू राहील. ए.सी. बंद ठेवूनच चालू राहतील.
सार्वजनिक मैदाने, आऊटडोर गेम्ससाठी दरदिवशी ५ ते ९ वाजेपर्यंत परवानगी.
खासगी कार्यालये ५० टक्के उपस्थितीत दुपारी ४ वाजतापर्यंत चालू राहतील.
अंत्ययात्रेस २० जणांची उपस्थिती असेल.
सांस्कृतिक कार्यक्रम, लग्नसमारंभ ५० टक्के उपस्थितीत केवळ सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजतापर्यंत करता येतील.
स्थानिक बैठका, निवडणूक कार्यक्रम ५० टक्के उपस्थितीत करता येतील.
सार्वजनिक प्रवास, आंतरजिल्हा प्रवास या गोष्टी नेहमीप्रमाणे सुरू राहतील.