नीट परीक्षा पुन्हा घ्या; काँग्रेसने दिले धरणे

By Atul.jaiswal | Published: June 13, 2024 05:01 PM2024-06-13T17:01:54+5:302024-06-13T17:02:34+5:30

सेवानिवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करून सखोल चौकशी करावी व दोषींवर करवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Retake the exam properly; Dharna given by Congress | नीट परीक्षा पुन्हा घ्या; काँग्रेसने दिले धरणे

नीट परीक्षा पुन्हा घ्या; काँग्रेसने दिले धरणे

अकोला : वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेत अनियमितता झाल्याचा आरोप करीत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने गुरुवारी(१३ जून) येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी करीत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे परिसर दुमदुमून गेला होता. नीट परीक्षेतील अनियमिततेमुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचे काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

सेवानिवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करून सखोल चौकशी करावी व दोषींवर करवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनस्थळी काँग्रेसचे पदाधिकारी अविनाश देशमुख, पूजा काळे, आकाश कवडे, प्रा. संजय देशमुख, गणेश कळसकर, विनोद नालट, माजी आमदार बबनराव चौधरी, प्रकाश तायडे, डॉ. प्रशांत वानखडे, विजय कौशल, महेश गणगणे, प्रदीप वखारीया, कपिल रावदेव, पराग कांबळे, राजेश मते, निखिलेश दिवेकर, अंशुमन देशमुख, अंकुश तायडे, अभिजित, तवर, उमाकांत कवडे, सुरेश मानपुत्र, राजेश राऊत, सोनाली मोरे, सुषमा मोरे, अरुणा लबडे, विजय जामणिक, तश्वर पटेल, पंकज देशमुख, मुकुंद सरनाईक, मो. फैजन, मो, शरीक, तेजस देवबाले, संतोष झंझाटे, इस्माईल टीव्ही वाले, युनिस शहा, ॲड. ओम खंडारे, चंद्रकांत बोरकर, हरीश देशमुख, मोहमद युसूफ, ओम रोंदळे, राजकुमार भट, दिलीप देशमुख, विवेक सरोदे, हरीश देशमुख आदी उपस्थित होते.

Web Title: Retake the exam properly; Dharna given by Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.