अकोला : परतीचा पाऊस यावर्षी लांबला असून, विदर्भातील चित्र शनिवार, १२ आॅक्टोबर रोजी स्पष्ट होणार असल्याचे संकेत कृषी हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी दिले आहेत.विदर्भातून प्रथम पूर्व विदर्भ, त्यानंतर पूर्व मराठवाडा, पश्चिम महाराष्टÑातील सांगली-सातारा मार्गे पाऊस परतीला निघतो. असे असले तरी यावर्षी आजमितीस ज्या ठिकाणी पाऊस थांबला, तेथून पाऊस परतीला निघाल्याचे स्पष्ट होते, असेही कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तथापि, भारतीय हवामानशास्त्र विभागाने अद्याप जाहीर केले नाही. यासंदर्भात शनिवारी चित्र स्पष्ट होणार असल्याचे संकेत आहेत.दरम्यान, ११ ते १८ आॅक्टोबरपर्यंत विदर्भात यवतमाळ, बुलडाणा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात किंचित वगळता उर्वरित विदर्भात पावसाची शक्यता नाही. त्यामुळे जेथे पाऊस थांबला, तेथून पाऊस परतीच्या प्रवासाला निघाल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.
- पूर्व विदर्भातून पाऊस परतीला निघतो. सध्यातरी काही भागात मान्सून आहे; पण जेथे पाऊस थांबला आहे, तेथून पाऊस परतीच्या प्रवासाला निघाल्याचे समजावे.- डॉ. रामचंद्र साबळे,ज्येष्ठ कृषी हवामान शास्त्रज्ञ, पुणे.