तेल्हारा : लॉकडाऊन काळात जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने महसूल विभागाच्या पथकाने धडक कारवाई करत हिवरखेड येथील पेट्रोल पंप व बेलखेड येथील देशी दारूच्या दुकानावर कारवाई करून ३१ हजार रूपयांचा दंड वसूल केला.
तालुक्यात महसूल विभागाचे पथक ॲक्टिव्ह झाले असून, डॉ. संतोष येवलीकर यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार जरे यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी व तलाठी यांच्या पथकाने १२ मे रोजी हिवरखेड येथील पेट्रोल पंपावर पेट्रोलची अवैधरित्या विक्री करत असल्याने १० हजाराचा दंड ठोठावला. बेलखेड येथील देशी दारूच्या दुकानातही नियमांचे उल्लंघन होत असल्याने ५ हजारांचा दंड ठोठावला. तसेच विनामास्क फिरणाऱ्यांवरसुद्धा या पथकाने कारवाई करत दंड वसूल केला.