.........................................................
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला तक्रारींचा आढावा !
अकोला : जिल्ह्यातील महसूल विभागाशी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त विविध तक्रारींचा आढावा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी घेतला. प्राप्त तक्रारींचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिले.
................................................
जि. प. शिक्षण विभागाच्या
कामाचा घेतला आढावा !
अकोला : जिल्हा परिषद प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या कामाचा आढावा सोमवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी घेतला. त्यामध्ये प्रामुख्याने यंदाच्या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासंदर्भात करण्यात आलेल्या नियोजनाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
...................................................
‘प्रलंबित प्रकरणे निकाली काढा!’
अकोला : अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डाॅ. नीलेश अपार यांनी सोमवारी अकोला उपविभागातील महसूल विषयक प्रलंबित तक्रारींचा आढावा घेत, प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी डाॅ. अपार यांनी अकोला तहसील कार्यालयाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले.