अकोला, दि. २२- जिल्हा परिषदेच्या विकासकामांसोबत कार्यालयीन आस्थापनेचा आढावा विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. सोबतच यावेळी पदवीधर मतदारसंघात नाव नोंदणी करताना कोणतीही आचारसंहिता भंग होत नसल्याचेही स्पष्ट केले. शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक यांनी तालुका स्तरावर शाळेमध्ये कॅम्प घ्यावेत, अनुदानित, विनाअनुदानित खासगी व शासकीय शाळेतील पदवीधर शिक्षकांची नाव नोंदणी पदवीधर मतदारसंघात करून घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले. जिल्हा परिषद ही मोठी आस्थापना असून, जिल्हा परिषदेने आपला सहभाग या राष्ट्रीय कार्यासाठी नोंदवावा, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित सर्व विभाग प्रमुखांना द्यावेत, असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. पदवीधर मतदारसंघात नाव नोंदणीसाठी, कॅम्पसाठी कोणताही आचारसंहि तेचा भंग होत नाही, असेही सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते.
विभागीय आयुक्तांकडून जिल्हा परिषदेचा आढावा
By admin | Published: October 23, 2016 2:14 AM