शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गे, सुप्रिया सुळेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
3
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
4
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
5
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
6
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
7
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
8
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
9
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
10
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
11
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
12
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
13
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
14
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
15
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
17
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
18
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
19
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
20
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?

राजेश्वर सेतू ते सरकारी बगिचा रस्त्याचे होणार रंदीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 2:03 PM

खोलेश्वर ते सरकारी बगिचापर्यंत २४ मीटर रुंद रस्त्यासाठी आ. गोवर्धन शर्मा यांनी पुढाकार घेत ३ हजार ७०५ मीटर अंतर जागेचा तिढा निकाली काढला.

अकोला: जुने शहरात जाण्यासाठी प्रशस्त रस्ते नसल्यामुळे या भागात वाहतूक कोंडी नित्याचा भाग झाला होता. त्यावर तोडगा म्हणून आमदार गोवर्धन शर्मा यांनी किल्ला चौक ते शंकरलाल जीनपर्यंत राजेश्वर सेतूचे निर्माण केले. खोलेश्वर ते सरकारी बगिचापर्यंत २४ मीटर रुंद रस्त्यासाठी आ. गोवर्धन शर्मा यांनी पुढाकार घेत ३ हजार ७०५ मीटर अंतर जागेचा तिढा निकाली काढला असून, त्या बदल्यात लोहिया कुटुंबीयांना ‘टीडीआर’ देण्यात आल्याची माहिती आहे.जुने शहरातील बहुतांश भागाचा गावठाणमध्ये समावेश होतो. त्यामुळे प्रशस्त रस्त्यांचा अभाव आहे. रस्ता रुंदीकरणाला वाव नसल्यामुळे लोखंडी पूल मार्गे जय हिंद चौक, काळा मारोती रोड, विठ्ठल मंदिर परिसरातून जाताना वाहतुकीची कोंडी नित्याची बाब झाली आहे. वाहतुकीचा सर्वाधिक ताण लोखंडी पूल मार्गावर असल्यामुळे मोर्णा नदीवर पर्यायी पूल उभारण्याची मागणी जोर धरू लागली होती. ही बाब ध्यानात घेता आ. गोवर्धन शर्मा यांनी मोर्णा नदीच्या पात्रातून किल्ला चौक ते शंकरलाल जीनपर्यंत राजेश्वर सेतूचे निर्माण केले. त्यामुळे जुने शहरातील सर्वाधिक वर्दळीचा भाग असलेल्या हरिहरपेठ, बाळापूर रोड, शिव नगरमधील वाहनधारकांना दिलासा मिळाला होता; परंतु शंकरलाल जीनपासून पुढे मनपाच्या मोटार वाहन विभागाच्या मुख्य रस्त्यावर येण्यासाठी वाहनधारकांना गल्लीबोळांमधून यावे लागत होते. वाहनधारकांची कुचंबणा लक्षात घेता आ. गोवर्धन शर्मा यांनी पुढाकार घेत राजेश्वर सेतू ते थेट शंकरलाल जीन ते सरकारी बगिचापर्यंत येणारा रस्ता अधिग्रहित केला. त्याकरिता लोहिया कुटुंबीयांचे मन वळवून २४ मीटर रुंद व ३ हजार ७०५ मीटर अंतराच्या रस्त्यासाठी जागा मिळविली. त्या बदल्यात लोहिया कुटुंबीयांना महापालिकेच्या माध्यमातून ‘टीडीआर’ उपलब्ध करून देण्यात आला.‘टीडीआर’ म्हणजे काय?रस्ता रुंदीकरण, नागरी हितासाठी ताब्यात घेतलेले भूखंड, आरक्षित भूखंड, सोसायट्यांमधील अ‍ॅमिनिटी स्पेस ताब्यात घेतल्यानंतर संबंधित जागा मालकाला मनपा प्रशासनाकडून ‘टीडीआर’ दिला जातो. त्याचा वापर जागा मालकाला त्याला गरज असेल तर त्याच्या इतर बांधकामावर वापरता येतो किंवा त्याची एखाद्या बांधकाम व्यावसायिकाला विक्री करता येते; मात्र त्याला हद्दीचे बंधन आहे. महापालिकेला प्रत्येक वेळी आर्थिक नुकसान भरपाई देता येणे शक्य नसल्याने सरकारने हा ‘हस्तांतरणीय विकास अधिकार’(टीडीआर) निर्माण करून पालिकेच्या विकास कामांमध्ये अडथळा येऊ नये, अशी व्यवस्था निर्माण केली आहे.

रस्त्यासाठी निधीची तरतूदराजेश्वर सेतू ते शंकरलाल जीन ते सरकारी बगिचापर्यंत २४ मीटर रुंद रस्त्याचे निर्माण केले जाणार आहे. त्यासाठी आ. गोवर्धन शर्मा यांनी निधीची तरतूद केली आहे. मार्च २०१९ पर्यंत हा प्रशस्त रस्ता सर्वसामान्यांसाठी खुला होणार असल्याचा दावा भाजपाकडून केला जात आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाGovardhan Sharmaगोवर्धन शर्मा