शहरातील शिवाजी चौकापासून ते घाणीवाला यांच्यापर्यंतच्या रस्त्याचे काम गत तीन वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. रस्त्याचे काही काम करण्यात आले होते; मात्र पुन्हा रस्ता उखडल्याने ठिगळ मारण्याचे काम सुरू आहे. रस्त्याच्या कामाची चौकशी करून दोषीविरुद्ध कारवाई करण्याची मागणी होत आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा, रेल्वे गेटजवळ, भगतसिंग चौक, इब्राहिम घाणीवाला यांच्या दुकानासमोर अर्धवट काम करण्यात आले आहे. रस्त्याचा कालावधी १८ महिन्यांत पूर्ण करण्याचा होता. ३६ महिने होऊनसुद्धा रस्त्याचे काम पूर्णत्वास गेले नाही. रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून, वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. तरीही रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. यासंदर्भात चौकशी करून दोषिविरुद्ध कारवाई करण्याची मागणी होत आहे. (फोटो)
मूर्तिजापूर शहरातील रस्त्याचे काम संथ गतीने!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 4:52 AM