अकोट शहरात दवाखाना, मेडिकल याव्यतिरिक्त सर्व आस्थापने बंद होती. किराणा व भोजनालय यांना घरपोच सेवा देण्यास मुभा होती; परंतु ग्राहकांनी पाठ फिरविल्याने त्यांनी दुकाने काही वेळेत बंद झाली. बँकांचे अंतर्गत व्यवहार सुरू होते. बँकेत नागरिकांना प्रत्यक्ष येणास बंदी होती. शहरात काही ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. या ठिकाणी वाहनाची तपासणी व नागरिकांची विचारपूस करण्यात येत होती. शहरातील खासगी दवाखान्यात मात्र गर्दी दिसत होती. बाजार समिती कार्यालय व शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसून आला. रस्त्यांवर केवळ पोलीस अधिकारी, कर्मचारी, रुग्णवाहिका व शासकीय कर्मचारी दिसून आले. महसूल, पोलीस व नगर परिषद पथकांनी शहरात फिरून लॉकडाऊनचा आढावा घेतला.
दुकानदारांना ठोठावला दंड
अकोट शहरातील काही भागांत दुकाने, आस्थापना उघड्या दिसल्याने महसूल व पोलीस पथकाने संबंधित दुकानदारांकडून दंड वसूल केला. दुकाने, आस्थापना उघड्या दिसल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी कडक निर्बंधांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
फोटो
ग्रामीण भागात कोरोनाची दहशत
अकोट : अकोट तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. प्रशासनाने ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केले आहे. गावांमध्ये कोरोनाची दहशत दिसून येत आहे.
ग्रामीण भागातील पोलीस पाटलांच्या उपस्थितीत महसूल व पोलीस प्रशासनाने बैठका घेतल्या आहेत. ग्रामीण भागाची जबाबदारी असलेले पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी मात्र क्वारंटाइनच्या भूमिकेत आहेत. सध्या ग्रामीण भागात कडक लॉकडाऊन सुरू आहे. दवंडी देऊन व घरोघरी फिरून कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही ग्रामपंचायतींकडून फवारणी व मास्कचे वाटप करण्यात येत आहे. सध्या शेतीची उलंगवाडी झाली असून, शेतकरी व शेतमजूर घरातच बसून आहेत. गावातील नागरिक कोरोना चाचणी करून घेत आहेत.
फोटो