- सदानंद सिरसाटअकोला: शेतकऱ्यांकडून हमीभावाने खरेदी केलेल्या एफएक्यू हरभºयापासून तयार झालेली कुजकी, सडलेली डाळ स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थींच्या माथी मारली जात आहे. या प्रकाराने राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने नियुक्त केलेल्या (एनईएमएल एनसीडिइएक्स ग्रुप कंपनी) मार्फत भरडाई करणाºया मिलर्सकडून लाभार्थींच्या आरोग्याशी खेळ सुरू केल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे. मिलर्सला शासनाने भरडाईसाठी एफएक्यू दर्जाचा हरभरा दिला. त्या हरभºयाची कुजकी, बुरशी लागलेल्या हरभरा डाळीचा पुरवठा लाभार्थींना केला जात आहे.१ मार्च २०१९ रोजीच्या शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या निर्णयानुसार अंत्योदय, अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांना प्रतिमाह तूर व हरभरा डाळ या दोन डाळींपैकी एक डाळ प्रत्येकी एक किलो ५५ रुपयेप्रमाणे वाटप करण्याचा आदेश देण्यात आला. त्यासाठी (एनईएमएल एनसीडिइएक्स ग्रुप कंपनी) मार्फत भरडाई करणाºया मिलर्सची नियुक्ती करण्यात आली. त्यामध्ये नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक या दोन झोनसाठी सप्तशृंगी मिलर्सची नियुक्ती करण्यात आली. नाफेडने हमीभावाने शेतकºयांकडून खरेदी केलेला हरभरा, तुरीची उचल करणे, भरडाई करणे, तयार डाळ एक किलोच्या पाकिटात बंद करून शासकीय गोदामात पोहचवणे, ही जबाबदारी सप्तशृंगी मिलर्सची आहे.अकोला जिल्ह्यात गेल्या काही दिवसात ६०० क्विंटल हरभरा डाळ प्राप्त झाल्याची माहिती आहे. त्यापैकी २०० क्विंटलचा पुरवठा दुकानांत करण्यात आला; मात्र कुजलेली, बुरशी, कीड लागलेली खराब डाळ पाहताच लाभार्थी स्वीकारण्यास नकार देत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसात ३५ ते ४० क्विंटल डाळ शासकीय गोदामात परत आल्याची माहिती आहे. त्या डाळीच्या ४ हजार पाकिटांचा साठा शासकीय गोदामात केला जात आहे. गोदामात ६० क्विंटलपर्यंत डाळ खराब आहे.- मिलर्सकडून फेरबदलाची शक्यता!शेतकºयांकडून धान्य खरेदी करताना ते एफएक्यू दर्जाचेच घेतले जाते. त्यामुळे शासनाने दिलेल्या एफएक्यूऐवजी खराब हरभºयाची डाळ लाभार्थींना वाटपासाठी कशी काय दिली जात आहे, याची चौकशी केल्यास मोठा घोटाळा उघड होण्याची शक्यता आहे. बाजारात आता डाळी महागल्या असताना स्वस्त धान्य दुकानांतूनही त्या मिळत नाहीत. मिलर्सच्या घोळापायी बाजारातील चढ्या भावाने डाळ खरेदी करण्याची वेळ गरिबांवर आणली जात आहे.