अकोला : कर्जत-जामखेड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यांच्या बारामती अॅग्रो लिमिटेडच्यावतीने पाचशे लीटर सॅनिटायझर अकोल्यातील प्रशासनासाठी पाठविले आहेत.कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घरात राहणे आणि खबरदारी पाळणे, हाच एकमेव उपाय आहे; मात्र कामासाठी घराबाहेर पडल्यास कोरोनाचा संसर्ग टाळावा, यासाठी सॅनिटायझर सर्वात उत्तम उपाय आहे. सध्या सर्वत्र ‘सॅनिटायझर’चा काळाबाजार सुरू आहे. त्याचवेळी कर्तव्यावर असलेल्या अकोलेरांसाठी थेट बारामतीने मदतीचा हात दिला आहे. आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो लिमिटेडच्यावतीने पाचशे लीटर सॅनिटायझर कर्मचाऱ्यांसाठी पाठविले आहेत. शनिवारी सकाळी बारामती येथून सॅनिटायझरचा ट्रक अकोल्यामध्ये दाखल झाल्यानंतर अकोलाराष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी पक्षाच्यावतीने ५०० लीटर सॅनिटायझर अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांना सुपूर्द केले. यावेळी राष्ट्रवादी युवक महानगराध्यक्ष करण दौड, तहसीलदार लोखंडे व पंकज मोहोड उपस्थित होते.
रोहित पवार यांनी पाठविले प्रशासनासाठी ‘सॅनिटायझर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 5:32 PM