अकोला- राज्यात ३0 वर्षांपूर्वी अंकुर साहित्याची चळवळ उभी करणारे हिंमतराव शेगोकार यांचे रविवारी रात्री हृदयविकाराच्या धक्कय़ाने निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. जिल्हा परिषदेतील नोकरी सांभाळत साहित्य क्षेत्रात त्यांनी ठसा उमटविला होता. ३0 वर्षांपूर्वी अंकुर साहित्य प्रकाशनाच्या रूपाने रोवलेले रोपटे हळूहळू विशाल वृक्षाचे स्वरूप घेत आहे. त्यांच्या पुढाकाराने आतापर्यंत ७0 पेक्षा अधिक पुस्तकांचे प्रकाशन झाले आहे. त्यांच्याच माध्यमातून अंकुर साहित्य संमेलनाचे आयोजनही होत आले आहे. राज्यातील विविध ठिकाणी ही साहित्य संमेलने भरविण्यात आली होती. ते जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत सहाय्यक लेखाधिकारी पदावर कार्यरत होते. त्यांच्यामागे आई-वडील, पत्नी, २ मुली व एक मुलगा आणि बराच मोठा आप्त परिवार आहे.
अंकुर साहित्यातील तारा निखळला!
By admin | Published: August 18, 2015 1:33 AM