अकोला : जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांनी आपला मदतीचा हात प्रशासनाला देऊ केला आहे. रोटरी क्ल्ब या संस्थेने पीपीई किट्स व फेसमास्क चे वाटप केले तर जिल्हा मराठा मंडळ, चिखलगाव गावकरी मंडळी यांच्यासारख्या संस्थांनी मदतीचे धनादेश शुक्रवारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे सुपूर्द केला.अकोला जिल्हा मराठा मंडळाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५१ हजार रुपये, प्रधानमंत्री सहाय्यता निधीला ५१ हजार रुपये दिले. तर चिखलगाव गावकरी मंडळीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५१ हजार रुपयांचा निधी दिला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे, आ. रणधीर सावरकर, मराठा मंडळाचे अध्यक्ष डॉ. रणजीत सपकाळ, अॅड. संजय पाटील, प्रकाश पाटील, डॉ. विनोद बोर्डे आदी उपस्थित होते. तर चिखलगावचे सरपंच सचिन थोरात, दामोदर थोरात, नामदेवराव ढगे आदी उपस्थित होते.रोटरी क्लबने डॉक्टरांसाठी ४० पीपीई किट्सचे वाटप केले. यावेळीही संजय धोत्रे यांच्यासह इस्त्राईल नाजमी, डॉ. जुगल चिरानिया, रोटरी क्लबचे अध्यक्ष उदय वझे, अॅड मनोज अग्रवाल, डॉ. सत्यनारायण खोरीया, विनोदकुमार टोरल आदी उपस्थित होते.
रोटरी क्लबतर्फे पीपीई किट्स, फेसमास्क; सामाजिक संघटनांतर्फे आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 3:01 PM