अकोला : अकोला : मध्य रेल्वेच्यारेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) “ऑपरेशन नन्हे फरिश्ते” अंतर्गत गेल्या ६ महिन्यांत म्हणजे एप्रिल २०२३ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत मध्य रेल्वेवरील रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवरून शासकीय रेल्वे पोलीस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचारी यांच्या समन्वयाने ७३३ मुलांची सुटका केली आहे. यामध्ये ५१७ मुले आणि २१६ मुलींचा समावेश आहे आणि चाइल्डलाइन सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांचे पालकांशी पुनर्मिलन झाले आहे.
काही भांडणामुळे किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगले जीवन किंवा शहराचे ग्लॅमर इत्यादींच्या शोधात आपल्या कुटुंबियांना न सांगता रेल्वे स्थानकावर येणारी मुले प्रशिक्षित आरपीएफ जवानांना आढळतात. हे प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी बोलून त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात. "मिशन जीवन रक्षा" मध्ये आरपीएफचे जवान स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवत आहेत. सप्टेंबर २०२३ मध्ये आरपीएफ जवानांनी ३ मौल्यवान जीव वाचवले.
विभागनिहाय अशी आहे आकडेवारीविभाग - सुटका केलेल्या मुलांची संख्यामुंबई : २०६ (१३९ मुले, ६७ मुली)भूसावळ : २०५ (१२८ मुले, ७७ मुली)पुणे : १८८ (१८१ मुले, ७ मुली)नागपूर : ९५ (४७ मुले, ४८ मुली)सोलापूर : ३९ (२२ मुले,१७ मुली)
३९ लाखांचे सामान प्रवाशांना केले परतऑपरेशन “अमानत” अंतर्गत सामान पुनर्प्राप्त करणे आणि सुपूर्द करणे – बरेच प्रवासी ट्रेनमध्ये चढण्यासाठी किंवा ट्रेन/स्टेशन सोडण्याच्या घाईत सामान/मोबाइल यांसारखे सर्व सामान घेणे विसरतात. या ऑपरेशन अंतर्गत आरपीएफ कर्मचारी अशा वस्तू सुरक्षित करण्यात मदत करतात आणि योग्य मालकाला परत मिळवून देतात. या ऑपरेशन अंतर्गत आरपीएफ ने सप्टेंबर २०२३ मध्ये अंदाजे रु. ३९,५१,९३५/- पेक्षा जास्त किमतीचे १२८ सामान/वस्तू परत मिळवल्या.