अकोला : कोरोना काळात गत मे अखेरपर्यंत कोरोना विषाणू संसर्गामुळे जिल्ह्यात ८७ बालकांचे पालक गमावले असून, त्यापैकी जून अखेरपर्यंत ६८ बालक बालसंगोपन योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले आहेत. कोरोनामुळे पालक गमावलेल्या या बालकांच्या बॅंक खात्यात दरमहा १ हजार १०० रुपयांचे आर्थिक साहाय्य जमा करण्यात येणार आहे.
कोरोना विषाणू संसर्गामुळे गत मे अखेरपर्यंत जिल्ह्यात १८ वर्षाआतील ८७ बालकांचे पालक गमावले. त्यामध्ये काहींची आई तर काहींच्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनामुळे पालकांचे छत्र हरवलेल्या बालकांना शासनाच्या बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यासाठी जून अखेरपर्यंत ६८ बालकांना बालकल्याण समितीमार्फत पात्र ठरविण्यात आले. त्यामुळे बालसंगोपन योजनेंतर्गत कोरोनामुळे पालक गमावलेल्या जिल्ह्यातील ६८ बालकांच्या बॅंक खात्यात दरमहा १ हजार १०० रुपये आर्थिक साहाय्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
१९ बालकांचे प्रस्ताव बालकल्याण समितीकडे सादर!
कोरोनामुळे जिल्ह्यात मे अखेरपर्यंत ८७ बालकांचे पालक गमावले. त्यापैकी जून अखेरपर्यंत ६८ बालकांना बालसंगोपन योजनेच्या लाभासाठी पात्र ठरविण्यात आले असून, उर्वरित १९ बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यासाठी संबंधित बालकांचा प्रस्ताव जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत बालकल्याण समितीकडे सादर करण्यात आला आहे.
१८ वर्षापर्यंतच मिळणार
योजनेचा लाभ!
काेरोना विषाणू संसर्गामुळे पालकांचा मृत्यू झालेल्या बालकांना बालसंगोपन योजनेंतर्गत दरमहा १ हजार १०० रुपये आर्थिक साहाय्य दिले जाते. या योजनेत वयाच्या १८ वर्षापर्यंतच बालकांना योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
कोरोनामुळे मे अखेरपर्यंत जिल्ह्यात ८७ बालकांचे पालक गमावले असून, त्यापैकी आतापर्यंत ६७ बालकांना बालसंगोपन योजनेच्या लाभासाठी पात्र ठरविण्यात आले असून, दरमहा १ हजार १०० रुपयांचे आर्थिक साहाय्य त्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. तसेच उर्वरित १९ बालकांना योजनेचा लाभ देण्यासाठी बालकल्याण समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
विलास मरसाळे
जिल्हा महिला बालविकास अधिकारी