२० बसेस आगारातच उभ्या!
अकोला : जिल्ह्यात सायंकाळनंतर निर्बंध व प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्याने शहरातील आगार क्रमांक २ मधून बसेस कमी सोडण्यात येत आहे. अद्यापही २० बसेस उभ्या असून ३२ बसेस धावत आहे.
१३ टक्के क्षेत्रात तिळाची लागवड
अकोला : जिल्ह्यात चांगला पाऊस असल्याने बहुतांश भागात पेरण्या आटोपल्या आहे. यामध्ये १,११६ हेक्टर क्षेत्रात तिळाची लागवड करण्याचे नियोजन होते; परंतु केवळ १४४ हेक्टर म्हणजेच १३ टक्के क्षेत्रात लागवड झाली आहे.
पेट्रोलचे दर १०७ रुपये लीटर
अकोला : गत काही महिन्यांपासून पेट्रोल व डिझेलच्या दरामध्ये विक्रमी वाढ होत आहे. पेट्रोलचे दर १०७ रुपये लीटरपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला चांगलीच झळ पोहोचत आहे.
अग्रसेन चौकात खड्डेच खड्डे
अकोला : शहरातील अग्रसेन चौकात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. पावसाळा सुरू असल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचते. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा अंगावर पाणी उडण्याचे प्रकारही होतात.
खराब रस्त्यामुळे एसटी समस्या वाढली!
अकोला : ग्रामीण भागातील अनेक रस्ते खराब झाले आहे. या रस्त्यांमुळे एसटी बसेसमध्ये बिघाड होण्याचे प्रकार वाढले आहे. सद्यस्थितीत वर्कशॉपमध्ये ४-५ बसेस दुरुस्तीच्या कामासाठी आल्या आहे. त्यामुळे एसटीची समस्या वाढत आहे.
तणांमध्ये वाढ; फवारणीला वेग!
अकोला : गत काही दिवसांआधी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे शेतात पाणी तुंबले होते. शेतात जाणे शक्य नव्हते. दरम्यान, शेतात तणांचे प्रमाण वाढले आहे. आता पाणी ओसरल्यानंतर फवारणीला वेग आला आहे.
रुग्णसंख्या कमी तरी पॅसेंजर बंदच!
अकोला : दीड महिन्यांपासून राज्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे; मात्र पॅसेंजर गाड्या अद्यापही बंद आहे. यामध्ये भुसावळ-नरवेल, भुसावळ-नागपूर पॅसेंजरचा समावेश आहे. ह्या गाड्या सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.