लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पातूर तहसील कार्यालयातील मंडळ अधिकार्याला त्याच्या मुलाचे बरे-वाईट करण्याची मोबाइलवर धमकी देऊन २५ लाख रुपयांची खंडणी मागणार्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी अटक केली.सस्तीचे मंडळ अधिकारी तथा लहान उमरीतील उत्तरा कॉलनीतील रहिवासी महादेव प्रल्हाद सरप (५0) २४ सप्टेंबर रोजी घरी असताना त्यांच्या मोबाइलवर अनोळखी क्रमांकावरून फोन आला. सदर अनोळखी व्यक्तीने मंडळ अधिकारी सरप यांना नागपूर क्राइम ब्रँचमधून बोलत असल्याचे सांगून २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता नागपूर क्राइम ब्रँचला तातडीने हजर राहण्याचे सांगितले; मात्र सरप यांनी याकडे दुर्लक्ष केले. तब्बल एक महिन्यानंतर २९ ऑक्टोबर २0१७ रोजी परत त्यांना दुसर्या अनोळखी मोबाइल क्रमांकावरून फोन आला. तुम्ही नोकरीमध्ये अवैधरीत्या भरपूर पैसे कमाविले असून, तुमची मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार झाली असल्याचे सांगत चौकशीसाठी तातडीने हजर राहण्याचे या मोबाइल कॉलवर सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना ३0 ऑक्टोबर रोजी परत कॉल आल्यानंतर राधाकृष्ण टॉकीजजवळ भेटण्यास बोलाविले. सरप या ठिकाणावर गेले असता प्रशांत अजाबराव म्हैसने (रा. अकोला) असे नाव सांगून एका युवकाने त्यांना २५ लाख रुपयांची मागणी केली. तुमची दोन्ही मुले नागपूर येथे शिक्षण घेत आहेत. तुम्ही पैसे दिले नाही, तर तुमची लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार करून तुम्हाला कारागृहात टाकण्याची धमकी यावेळी प्रशांत म्हैसने नाव सांगत असलेल्या व्यक्तीने सरप यांना दिली. पैसे न दिल्यास नागपूर येथील मुलाला गायब करण्याची धमकीही दिली. या प्रकारामुळे महादेव सरप घाबरल्याने त्यांनी खंडणी बहाद्दरास २५ लाख रुपये देण्यासाठी सात दिवसांचा अवधी मागितला. खंडणी बहाद्दराने त्यांना सात दिवसांचा अवधी दिला. त्यानंतर मंगळवारी सरप यांना खंडणी बहाद्दर म्हैसने याने खोलेश्वर येथील हनुमान मंदिराजवळ २५ लाख रुपये घेऊन बोलाविले; मात्र त्यांच्याकडे इतके पैसे नसल्याने त्यांनी यासंदर्भात पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून महादेव सरप यांना भेटण्यासाठी आलेला खंडणी बहाद्दर प्रशांत म्हैसने नाव सांगत असलेल्या युवकास अटक केली. त्याच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंडळ अधिकार्यास मागितली २५ लाखांची खंडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 1:44 AM
अकोला : पातूर तहसील कार्यालयातील मंडळ अधिकार्याला त्याच्या मुलाचे बरे-वाईट करण्याची मोबाइलवर धमकी देऊन २५ लाख रुपयांची खंडणी मागणार्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी अटक केली.
ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेने केली कारवाई