अकोला: दुर्बल व वंचित घटकांसाठी राखीव असलेल्या ‘आरटीई’च्या २५ टक्के राखीव जागांवर पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात १८६५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यापैकी आतापर्यंत १३९0 विद्यार्थ्यांनी इंग्रजी व मराठी माध्यमांच्या राखीव जागांवर प्रवेश घेतला आहे. आता ५१0 जागा उरल्या असून, या जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातील दुर्बल व वंचित घटकांसाठी आरटीई नोंदणीकृत २0७ शाळांमध्ये एकूण २३७५ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या राखीव जागांसाठी ‘आरटीई’ अंतर्गत प्राथमिक शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे आॅनलाइन अर्ज मागविले होते. पालकांच्या मागणीनुसार अर्ज भरण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यात दुर्बल व वंचित घटकांतील तब्बल ६ हजार ४१४ पालकांनी आपल्या पाल्यांचे अर्ज भरले होते. पहिल्या व दुसºया टप्प्यात १८६५ पाल्यांची पहिल्या टप्प्यात इंग्रजी व मराठी शाळांमधील राखीव जागांसाठी निवड करण्यात आली. आता तिसºया टप्प्यात उर्वरित ५१0 जागा भरण्यात येतील का, त्यासाठी सोडत काढण्यात येणार का, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. निवड झालेल्या १८६५ विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत १३९0 विद्यार्थ्यांचे जिल्ह्यातील व शहरातील नामांकित इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळेत प्रवेश झाले आहेत. भाडे करारनामा, तांत्रिक त्रुटींमुळे शेकडो पालक वंचित‘आरटीई’च्या रिक्त जागांवरील प्रवेशासाठी बाहेरगावच्या पालकांना भाडेकरारनामा सादर करावा लागतो; परंतु भाडेकरारनामा मिळण्यात अडचणी येत असल्याने तसेच इतर तांत्रिक कारणांमुळे शेकडो पालकांनी अर्ज करूनही त्यांना प्रवेशपासून वंचित राहावे लागत आहे. महत्त्वाची कागदपत्रे उपलब्ध नसणे, शाळांकडून प्रवेशासाठी नकारघंटा मिळणे आदी कारणांमुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून मुकावे लागणार आहे. त्यामुळे ५00 च्या जवळपास जागा रिक्त राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.‘आरटीई’ प्रवेशाची अशी आहे स्थिती!एकूण शाळा- २0७एकूण जागा- २३७५एकूण अर्ज- ६४१४निवड झालेले विद्यार्थी- १८६५प्रवेशित विद्यार्थी- १३९0