अकाेला : शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत (आरटीई) शाळा प्रवेशासाठी ११ जून पासून संबधीत शाळेत कागदपत्रांची पडताळणी हाेणार हाेत असून त्यानंतरच प्रवेशाची प्रक्रीया पुर्ण केली जाणार आहे . पहिल्या टप्प्यात १ हजार ८१७ विद्याथ्याची निवड हाेणार असून ही निवड तात्पुरती असणार आहे.
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार जिल्ह्यात आरटीई अंतर्गत १ हजार ९६० जागा असून, ४ हजार ७०७ अर्ज प्राप्त झाले हाेते. या जागांमध्ये खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशस्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला, मुलींसाठी राखीव आहेत तसेच समाजातील आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. प्रवेशासाठी पहिली साेडत ७ एप्रिल रोजी ऑनलाईन काढली हाेती
आता निवड यादीतील िवद्यार्थ्यांना प्रवेशासाठी २० दिवसांचा कालावधी देण्यात येणार असून साेडतीमध्ये संधी मिळालेल्या पाल्यांच्या पालकांनी मूळ कागदपत्रे, छायांकित प्रती व अन्य दस्तावेज जमा करावे लागणार आहेत.