अकोला : आरटीई अंतर्गत पात्र बालकांना इयत्ता पहिल्या वर्गात मोफत प्रवेश देण्यासाठी ९ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील १९३ खासगी शाळांनी नोंदणी केली आहे. शाळा नोंदणीसाठी १० फेब्रुवारी ही अंतिम मुदत असून, ११ फेब्रुवारीपासून आॅनलाइन प्रवेश अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (राइट टू एज्युकेशन) मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना २५ टक्के मोफत प्रवेश देणे खासगी शाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने सन २०२०-२१ या शैक्षणिक सत्रासाठी मोफत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात २१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी या दरम्यान शाळांना नोंदणी करावी लागणार होती. या कालावधीत पुरेशा संख्येत खासगी शाळांची नोंदणी होऊ शकली नसल्याने ९ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती; परंतु या कालावधीतही पुरेशा संख्येत शाळांची नोंदणी न झाल्याने १० फेब्रुवारी ही अंतिम मुदत वाढवून देण्यात आली होती. वाढीव मुदतीनंतर ९ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील १९३ शाळांची नोंदणी झाली आहे.मोफत प्रवेशासाठी २,२५८ जागा राखीवआरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशासाठी रविवारपर्यंत जिल्ह्यातील १९३ शाळांची नोंदणी झाली आहे. त्यानुसार मोफत प्रवेशाच्या २,२५८ जागा राखीव आहेत.उद्यापासून आॅनलाइन अर्ज सुरूशाळांची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर पालकांना आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी आॅनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. ही प्रक्रिया ११ फेब्रुवारीपासून महिन्याची शक्यता असल्याचे संकेतस्थळावर वर्तविली जात आहे. त्यासाठी २९ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली असून, ती वाढण्याची शक्यता आहे. शाळांना नोंदणीसाठी मुदतवाढ मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी अर्ज सादरीकरणाची प्रक्रियाही विलंबाने सुरू केली जाईल.आरटीई अंतर्गत आता खासगी शाळांना १० फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करणे आवश्यक होते. शनिवारपर्यंत जिल्ह्यातील १९३ शाळांनी नोंदणी केली आहे. अधिकाधिक शाळांनी नोंदवी करावी, अशा सूचना संबंधित शाळांना दिल्या आहेत.- वैशाली ठगशिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, अकोला