शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
3
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
4
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
5
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
6
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
7
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
8
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
9
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
10
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
11
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
12
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
13
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
14
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
15
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
16
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
17
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
18
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
19
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
20
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का

अकोल्यात भारिप-बमसंमधील सुंदोपसुंदी चव्हाट्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 2:15 PM

अकोला : भारिप-बमसंचे राष्ट्रीय नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमातून पक्षाच्या जुन्या-जाणत्या पदाधिकाऱ्यांना बाजूला सारणाऱ्या काही अतिउत्साही नवख्यांसोबत व्याख्यानाच्या आधी चांगलीच गरमागरमी झाली.

ठळक मुद्देभारिप-बमसंची कार्यकारिणी बरखास्त झाल्यापासून काही नवे चेहरे चांगलेच चेकाळल्याचा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून पक्षात सुरू झाला. जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांची घोषणा अद्यापही न केल्याने पक्षातील उत्सुकता शिगेला पोचली आहे. काहींनी तर पदाधिकाऱ्यांची घोषणा होण्यापूर्वी स्वत:ला त्या पदासाठी घोषित केल्याचेही प्रकार लगतच्या काळात घडले आहेत.

अकोला : भारिप-बमसंचे राष्ट्रीय नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमातून पक्षाच्या जुन्या-जाणत्या पदाधिकाऱ्यांना बाजूला सारणाऱ्या काही अतिउत्साही नवख्यांसोबत व्याख्यानाच्या आधी चांगलीच गरमागरमी झाली. अखेर नियोजनात त्यांचा सहभाग घेत वादावर तात्पुरता पडदा पडला.भारिप-बमसंची कार्यकारिणी बरखास्त झाल्यापासून काही नवे चेहरे चांगलेच चेकाळल्याचा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून पक्षात सुरू झाला. त्यातच पक्षाचे नेते अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह प्रदेश कार्यकारिणीने जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांची घोषणा अद्यापही न केल्याने पक्षातील उत्सुकता शिगेला पोचली आहे. त्यातच काहींनी अकोला जिल्हाध्यक्ष पदासाठी आधीपासूनच गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. काहींनी तर पदाधिकाऱ्यांची घोषणा होण्यापूर्वी स्वत:ला त्या पदासाठी घोषित केल्याचेही प्रकार लगतच्या काळात घडले आहेत.दरम्यान, पक्षाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांसाठी नियोजन समिती गठित करण्यात आली. त्यामध्ये सहभागी असलेल्यांनी काही जुन्या-जाणत्या पदाधिकाऱ्यांना डावलण्याचे प्रकार सुरू केले. या प्रकाराने संतप्त झालेल्या काहींनी बुधवारी दुपारी यावर काही संबंधितांना जाब विचारला. त्यावेळी वादावर पडदा टाकण्यासाठी व्याख्यानाच्या कार्यक्रमात त्या पदाधिकाºयांना सहभागी करून घेण्यात आले.- जिल्हाध्यक्ष पदासोबतच जिल्हा परिषदेवर डोळाज्या काही अतिउत्साही पदाधिकाऱ्यांनी जुन्या-जाणत्यांना टाळून सवतासुभा निर्माण करण्याचा प्रकार सुरू केला, त्यांनी एकाचवेळी दोन साध्यावर नजर ठेवली आहे. त्यामध्ये जिल्हाध्यक्ष पदाच्या शर्यतीत ज्यांचा अडसर येतो, त्यांना बाजूला सारणे, त्यायोगे जिल्हाध्यक्ष किंवा जिल्हा कार्यकारिणीत पद मिळवणे, हा एक आणि दुसरे म्हणजे, येत्या काळातील जिल्हा परिषद निवडणुकीत तिकीट वाटप समितीवर ताबा घेणे, हे दोन उद्देश समोर ठेवून सध्या भारिप-बमसंमध्ये ‘रॅट रेस’ सुरू झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून दिवसागणिक पक्षाच्या पदाधिकाºयांमध्ये वादाच्या ठिणग्या पडत आहेत.- महापालिका निवडणुकीतील पानिपतचा विसरज्यांनी आता पक्षाची सूत्रे हातात घेण्याची धडपड सुरू केली आहे. त्यापैकी अनेकांनी महापालिका निवडणुकीत पक्षाला पराभवाचे पानिपत पाहण्यास भाग पाडले आहे. त्यातील अनेक प्रकरणांच्या तक्रारीही नेतृत्त्वाकडे झालेल्या आहेत. तरीही जिल्हा कार्यकारिणी किंवा जिल्हा परिषद निवडणुकीची धुरा आपल्याच खांद्यावर येईल, यासाठी काहींनी देव पाण्यात ठेवून काम सुरू केले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर