शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या नाताळ सोडत तिकिट विक्रीचे निकष बदलले

By admin | Published: January 02, 2016 8:36 AM

लोकमत इम्पॅक्ट; तिकिट खरेदीची बंधनं शिथील; शासनाने काढला नव्याने आदेश.

राजेश शेगोकार/बुलडाणा : महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या नाताळ न्यू ईयर सोडतीची ५ हजार तिकिटे खरेदीचे बंधन राज्य शासनाने टाकल्यामुळे राज्यातील एकाही विक्रेत्याने तिकिटाची उचल केली नव्हती. त्यामुळे ही सोडतच रद्द होण्याचा मार्गावर असल्याचे वृत्त ह्यलोकमतह्ण ने ३0 डिसेंबर रोजी प्रकाशीत केल्यानंतर शासनाला जाग आली असून, नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी वित्तविभागाने आदेश काढून तिकिटाच्या खरेदीबाबत २४ नोव्हेंबर रोजी काढलेला अध्यादेश रद्द करून जुनेच धोरण कायम ठेवले आहे. राज्याच्या अल्पबचत संचालनालयाच्या वतिने महाराष्ट्र राज्य लॉटरीची नाताळ न्यू ईयर सोडतीचे दरवर्षी आयोजन केले जाते. यावर्षीसुद्धा ५ जानेवारीला नाताळ न्यू ईयर सोडत काढली जाणार होती. त्यासाठी राज्य शासनाच्या अल्पबचत संचालनालयाच्या वतिने ४ लाख तिकिटे छापण्यात आली; मात्र या तिकीटाच्या विक्रीबाबत २४ नोव्हेंबर रोजी वित्त विभाग तसेच अल्पबचत लॉटरी संचालनालयाचे कक्षाधिकारी माधव आव्हाड यांच्या सहीने अध्यादेश जारी करण्यात आला. या अध्यादेशामध्ये लॉटरी विक्रेत्यांना किमान ५ हजार तिकिटे खरेदी करण्याचे बंधन टाकण्यात आले. यासोबतच विक्रेत्यांना मिळणार्‍या कमीशनबाबतही नव्याने नियम घोषीत करण्यात आले. पूर्वी ५00 ते ४९ हजार ९९९ तिकीटांच्या खरेदीवर विक्रेत्यांना २0 टक्के कमीशन दिले जात होते. २४ नोव्हेंबरच्या अध्यादेशानुसार ५ हजार ते १ लाख तिकिटाच्या खरेदीवर २0 टक्के कमीशन ठेवण्यात आले. शंभर रूपये किमतीच्या ५00 तिकिटांची खरेदी करणार्‍या सामान्य विक्रेत्यालाही किमान ५ हजार तिकिटांची खरेदी करणे बंधनकारक झाल्याने त्यांना आर्थिकदृष्टया ही बाब परवडणारी नसल्याने एकाही विक्रेत्यांने तिकिटांची उचल केली नाही. ही बाब ह्यलोकमतह्ण ने प्रकाशीत करताच वित्तविभागाने तत्काळ दखल घेत १ जानेवारी रोजी सुधारित आदेश काढला आहे. यामध्ये ५00 ते ५0 हजार तिकिट खरेदी करणार्‍या एजंटांना पूर्ववत २0 टक्के कमीशन कायम ठेवण्यात आले असून, कमीशनचे स्वरूप नियमित सोडतीप्रमाणेच ठेवले आहे.

आता सोडत झाली तरी शासनाला तोटा

         वित्त विभाग तसेच अल्पबचत लॉटरी संचालनालयाच्या नियमानुसार प्रत्येक सोडतीनुसार कराचा भरणा शासनाच्या तिजोरीत करावा लागतो. त्यामुळे आता नव्या अध्यादेशनुसार तिकीटे विक्री झाली तरी करापोटी शासनाकडे तब्बल १२ लाख रूपये अल्पबचत संचालनालयाला भरावे लागणारच आहेत. नाताळ न्यू ईयर सोडत ५ जानेवारी रोजी होणार असून तिकीटासंदर्भात नवा आदेश १ जानेवारी दूपारी ३ वाजता काढण्यात आला. त्यामुळे २ जानेवारी व ४ जानेवारी हे दोन दिवस कामकाजाचे असल्याने किती तिकीटांची विक्री होईल, याबाबत संशय कायमच आहे. सण उत्सवाच्या निमित्ताने निघणारी विशेष सोडत मंगळवारी असेल तर त्या दिवशी निघणारी साप्ताहीक सोडत रद्द करण्याचा नियम असल्याने शासनाच्या महसुलाचा दूहेरी तोटा होणारच आहे.