नाल्यांमध्ये फवारणीला सुरुवात
अकोला : जुने शहरातील नाल्यांमध्ये सांडपाणी साचून असून या पाण्यात डासांची उत्पत्ती वाढली आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरियासदृश आजारांचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर जुने शहरातील नाल्यांमध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सोमवारी फवारणी करण्यात आली आहे.
अकोलेकर बेफिकीर; नागरिक विनामास्क!
अकोला : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट जवळपास ओसरली आहे. कोरोना कमी झाला असला तरी संपुष्टात आला नाही. तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात असताना अकोलेकर मात्र बेफिकीर असल्याचे दिसून येत आहे. शनिवार, रविवार निर्बंध असतानाही शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
श्वानांचे निर्बीजीकरण व रॅबिज लसीकरणाला प्रारंभ
अकोला : शहरातील मोकाट श्वानांच्या वाढत्या संख्येमुळे सर्वसामान्यांचा जीव धाेक्यात सापडला हाेता. वाहनांच्या मागे धावणाऱ्या श्वानांमुळे नागरिक जेरीस आले हाेते. तसेच पिसाळलेल्या श्वानांनी चावा घेतल्यामुळे अकाेलेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले हाेते. मनपा प्रशासनाने भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण व रॅबिज लसीकरणास सुरुवात केली आहे.
रतनलाल प्लॉट चौकात वाहतुकीची कोंडी
अकोला : जिल्ह्यात साेमवारपासून अनलॉकला सुरुवात झाल्याने दुपारी चार वाजतापर्यंत संपूर्ण बाजारपेठ पूर्ववत सुरू झाली. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची गर्दीही झाली. परिणामी रनलाल प्लॉट चौक परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले.