चोहोट्टा बाजार : अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार येथे ग्रामीण रुग्णालय व पोलीस स्टेशनची निर्मिती होणार असल्याचे आश्वासन विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी सरपंच विजया प्रकाश राणे यांना रविवारी दिले.
चोहोट्टा बाजार येथे मुख्य बाजार पेठ असून, येथे ५२ खेड्यांचा संपर्क असल्याने दररोज नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नेहमीच उपस्थित होतो. यासाठी येथे पोलीस स्टेशनची आवश्यकता असल्याची मागणी होत आहे. तसेच ग्रामीण रुग्णालयाची मागणी सुद्धा प्रलंबित आहे. या संदर्भात नुकताच अधिवेशनामध्ये आमदार अमोल मिटकरी यांनी हा मुद्दा उपस्थित करून दोन्ही मागण्या पूर्ण व्हाव्या, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दोन्ही प्रश्न त्वरित मार्गी लावणार असल्याचे आश्वासन आमदार मिटकरी यांनी सरपंच विजया प्रकाश राणे यांना दिले आहे. आमदार मिटकरी व सरपंच विजया राणे यांनी आवश्यक जागेची पाहणी केली. यावेळी आदर्श शाळा अभियानातून उर्दू शाळेचे नाव वगळण्यात आल्याची तक्रार कयुम खा पठाण यांनी आमदार मिटकरी यांच्याकडे केली. कार्यक्रमात आमदार मिटकरी यांचा ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अमोल कळाने, श्याम राऊत, नंदकिशोर राणे, मोहन पाटील बुंदे ग्रामविकास अधिकारी एस. जे. उईके, चकरदास राणे, संतोष बुंदे, कयुमखा पठाण, मुनिर शाहा, तकदीरशा, शे रौफ़, लड्डू शाहा, ग्रा. पं. सदस्य धनंजय बुंदे, रविकिरण काकडे, दीपाली बुंदे, वर्षा बुंदे, विष्णू काकडे, जीवन बुंदे, मनीष बुंदे, रितेश सिरसाट, शाहरूख शाहा, राजू शाहा उपस्थित होते.
(वा.प्र.) ८ बाय ९ फोटो