लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : तांत्रिक बिघाड, पंक्चर होणे यासह अन्य कारणांमुळे गत दोन वर्षांत एस. टी. महामंडळाच्या १८६ बसेस रस्त्यातच बंद पडल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
जिल्ह्यात अकोला १, अकोला २, अकोट, तेल्हारा, मूर्तिजापुर असे पाच आगार आहेत. पाच आगार मिळून ३०० पेक्षा जास्त बसेस असून, १० वर्षांवरील जवळपास ५५ बसेस आहेत. सुरक्षित प्रवासासाठी अजूनही अनेकजण महामंडळाच्या बसेसला प्राधान्य देतात. एस. टी. महामंडळाची खासगी प्रवासी वाहनाशी स्पर्धा असून, प्रवाशांची पळवापळवी होऊ नये म्हणून आगार परिसरातील २०० मीटरमध्ये खासगी प्रवासी वाहने उभी करण्यास मनाई आहे. आगार परिसरातील नो पार्किंग झोनमध्ये खासगी प्रवासी वाहने उभी करणाऱ्याविरुद्ध योग्य ती कारवाई करावी, यासंदर्भात पोलीस व वाहतूक शाखेकडे आगार प्रमुखांतर्फे पत्रव्यवहारही करण्यात येतो. खासगी प्रवासी वाहनांशी स्पर्धा करताना एस. टी. महामंडळाला काही प्रमाणात नादुरुस्त व जुनाट बसेसमुळे गैरसोयीला सामोरे जावे लागते. तांत्रिक बिघाड उद्भवणे, पंक्चर होणे, स्टेअरिंग जाम होणे आदी कारणांमुळे गत दोन वर्षांत पाच आगार मिळून जवळपास १८६ बसेस रस्त्यातच बंद पडल्या.
काही बसेस ‘दे धक्का’ या प्रकारातील असल्याने वाहकासोबतच प्रवाशांनादेखील संबंधित बसला धक्का देण्याची वेळ येते. शहरांसह ग्रामीण भागातही महामंडळाच्या बसेसमुळे दळणवळणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. खासगी प्रवासी वाहनाच्या तुलनेत सुरक्षित प्रवास असल्यामुळे महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करण्याला अनेक प्रवासी पसंती देतात.
दुसरीकडे तांत्रिक बिघाड व अन्य कारणांमुळे रस्त्यातच बसेस बंद पडत असल्याने प्रवाशांना मनस्तापही सहन करावा लागतो.
रस्त्यातच एस. टी. बंद पडण्याची कारणे
अनेक बसेसची आयुर्मर्यादा संपत आल्याने तांत्रिक बिघाडामुळे अधूनमधून प्रवासादरम्यानच त्या बंद पडतात. तांत्रिक बिघाड निर्माण होणे, पंक्चर होणे, स्टिअरिंग जाम होणे, वायरिंगमध्ये दोष निर्माण होणे आदी कारणांमुळे रस्त्यातच काही बसेस बंद पडतात. या बसेस बंद पडल्यानंतर महामंडळाच्या दुसऱ्या बसमध्ये प्रवाशांना बसवून दिले जाते.
अकोला जिल्ह्यात अकोला १ अकोला २ अकोट तेल्हारा व मूर्तिजापूर हे ५ आगार असून बाळापूर पातूर आणि बार्शीटाकळी हे बस स्थानक आहेत अकोल्यातील पाच आजारात सुमारे ३०० पेक्षा जास्त बसेस असून त्या रोज ७०० ते ८०० बस येणेजाणे करतात. नवीन बसेसमुळे आता प्रवाशांना कमी त्रास सहन करावा लागत
वर्षाला आठ लाख रुपये एस. टी. मेन्टेनन्सला
महामंडळाच्या बसेसची नियमित देखभाल, दुरुस्ती करण्यात येते. यासाठी एका वर्षाला साधारणत: सात ते आठ लाख रुपये मेन्टेनन्सला खर्च येतो. पाचही आगारात बसेसची दुरुस्ती करण्यात येते. दरम्यान, बसेसच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च अकोला येथील मुख्य कार्यालयातून होत असल्याने या संदर्भात अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याचे कळते.
आगारामध्ये असलेल्या बसेसची वेळेवर व नियमित देखभाल दुरुस्ती करण्यात येते. मात्र तरीही रस्ते व काही तांत्रिक कारणामुळे बसेस बंद पडतात तर पंक्चर होणे यासारख्या अडचणी वारंवार येत असल्याने बस उभ्या ठेवाव्या लागतात.
अरविंद पिसोडे, आगारप्रमुख, अकोला २
आगारनिहाय बसेसची संख्या
अकोला १४२
अकोट ४५
तेल्हारा ३४
मूर्तिजापूर ४१