- गणेश मापारीमुर्तीजापूर : कोरेगाव भीमा येथील घटना पेटवण्या मागे भाजपचा हात आहे असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केला होता या आरोपाचा कृषी राज्यमंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी येथे चांगलाच समाचार घेतला. तुपकर हे नेहमीच चर्चेत राहण्याससाठी भडक वक्तव्य करतात, खरे तर त्यांची उंचीच नाही त्यांची केवळ सावली मोठी आहे. संघटनेत अनेकांचे काम असते. हे काम एखाद्या नेत्याच्या पाठीशी उभे राहते म्हणून ते काम त्याचेच असते असे नव्हे. तसेच तुपकर यांचे झाले आहे. पारावर गावगप्पा करणाऱ्यांच्या वक्तव्य ला काय अर्थ आहे, अशा खोचक शब्दात खोत यांनी तुपकरांवर टीका केली. मूर्तिजापूर तालुक्यातील कानडी येथे आयोजीत कास्तकार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आलेल्या सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना रविकांत तुपकर यांच्यावर टीकेचा भडीमार केला.सध्याच्या भाजप सरकारने यापूर्वीच्या कोणत्याही सरकारने दिली नव्हती, त्यापेक्षा अधिक कर्जमाफी शेतकºयांना दिली आहे. सरकार हे शेतकरी हीताचे काम करीत आहे. सरकारची कामगिरी चांगली राहिली असून, शेतकऱ्यांसाठी सर्वतोपरी करण्याचा प्रयत्न या सरकारचा आहे. सरकारचे चांगले काम लोकांपर्यंत पोहचत आहे. विरोधकांच्या हातात कोणताही मुद्दा नसल्यामुळे ते उठसूठ सरकारवर टीका करत आहेत, असे सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केले. आपल्या संघटनेचा विस्तार अन् सरकारचा प्रतिनिधी म्हणून ना.खोत राज्यभर दौरे करीत असून, प्रत्येक ठिकाणी त्यांच्यावर व सरकारवर होणाºया आरोपांचा ते समाचार घेत असतात. याचाचा पुढील भाग म्हणून खोत यांनी कानडी येथील शेतकरी मेळाव्यातही भाजप सरकार हे शेतकऱ्यांचे हीत पाहणारे असल्याचे ठासून सांगितले.
मी शेतकऱ्यांचा प्रतीनिधीशेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून आपण मंत्रिमंडळात आहोत. गत तीस वर्षांपासून मी शेतकऱ्यांसाठी काम करीत आहे. त्यामुळे शेतकºयांचे हीत कशात हे आहे, हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे.