- संजय उमकमूर्तिजापूर : तालुक्यात तीन बॅरेजची निर्मिती करण्यात येत असली तरी रोहणा बॅरेजचे काम अनेक वर्षांपासून रखडले असून ते अजूनही पुर्णत्वास गेले नाही. या बॅरेज निर्मितीमुळे अनेक गावे उजाळ होणार आहेत. यातील लंघापूर गावचे सिरसो गायरान परिसरात पुनर्वसन करण्यात येत असल्याने यासाठी किमान तीन एकराचे पुरातन तलाव भूईसपाट करण्यात आल्याने भविष्यात सिरसो येथे पाण्याचा निर्माण होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील सिरसो येथील गायरान परिसरात किमान तीन एकरावर ब्रिटीश कालीन तलाव होते. लंघापूर गावच्या पुनर्वसनासाठी या तलावाचा 'बळी' दिल्याने गावकऱ्यात प्रचंड संताप निर्माण झाला आहे. तालुक्यातून वाहणाऱ्या उमा नदीवर रोहणा बॅरेजची निर्मिती करण्यात येत आहे. सदर बॅरेजचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. परंतू या बॅरेज अंतर्गत येत असलेल्या लंघापूर गावचा पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्या गावच्या पुनर्वसनासाठी सिरसो गायरान परीसरातील गट नंबर २१६,२१७,२१८, २ हेक्टर ६४ आर (२६ हजार ४८२ चौरस मीटर ) एकर 'ई' क्लॉस जमिनीचे प्रावधान करण्यात आले. त्या दृष्टीने ले-आउट देखील करण्यात आले आहे. परंतू याच परिसरात किमान तीन एकर क्षेत्रावर असलेल्या ब्रिटिश कालीन तलावच्या भिंती पाडून तो जमीनदोस्त करण्यात आला आहे. मात्र या तलावाची सरकार दप्तरी नोंदच नसल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी विटभट्टी व्यवसायीकांनी यातवाच्या गाळासह भिंतीची माती चोरुन नेली होती त्या संदर्भात सिरसो ग्रामपंचायतने २००५ साली उपविभागीय अधिकारी यांना रितसर तक्रार केली होती. त्या पश्चात २०१९ मध्ये तलाव तोडल्या जाऊ नये अशी विनंतीही ग्रामपंचायतने संबधीत विभागाला केली होती. परंतु तेथे तलाव नसल्याच्या माहिती पासून शासन अनभिज्ञ आहे. एकीकडे शासन जलयुक्त शिवारासाठी भर देत असून त्यासाठी लाखोंचा खर्च होत असताना स्थानिक प्रशासनाच्या अहवालावरु पुनर्वसन विभागाने अख्खा तलावच गायब केला असल्याने गावकऱ्यात प्रचंड चिड निर्माण झाली आहे. लंघापूर च्या पुनर्वसनासाठी शासन स्तरावरून जमीन व घरारांसाठी ५० कोटी १२ लाख ७ हजार ४०४ रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे यातील २१ कोटी ६८ लाख १६ हजार एवढे पुनर्वसन अनुदान देणे बाकी आहे. परंतू या आणखी 'ई' क्लॉस जागा शिल्लक असताना पुनर्वसनासाठी पुरातन कालीन तलावाचा नाहक 'बळी' दिला असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.-पुनर्वसनासाठी सिरसो गायरान परिसरात ई - क्लॉस जागेचे प्रावधान आहे त्यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे, परंतु सदर जागेवर पुरातन तलाव असल्याची आपल्याला माहीती नाही, या संदर्भात आपण अधिक चौकशी करून अहवाल सादर करणार.- सदाशिव शेलार,जिल्हा पुनर्वसन अधिकारी, अकोला
लंघापुरच्या पुनर्वसनासाठी सिरसो येथील पुरातन तलावाचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 6:46 PM