अकोला: क्रीडा भारती विदर्भ प्रांतच्या वतीने लक्ष्मणराव पार्डीकर स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘वीरमाता जिजाऊ पुरस्कार-२०१९’ अकोल्यातील साधना मधुकरराव शिंगणे यांना प्रदान करण्यात आला.शुक्रवार, ३ मे रोजी झालेल्या सोहळ्यात साधनाताई यांना आंतरराष्ट्रीय खेळाडू व पंच वंदना कुलकर्णी-पिंपळखरे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी उद्योजक गोपाल खंडेलवाल, तहसीलदार अमित सोनवणे, पुरुषोत्तम मालानी, पंकज कोठारी, डॉ. महेंद्र काळे, प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुलकर्णी, डॉ. कृष्णमुरारी शर्मा, एन.पी. पागृत, प्रा. शारदा बियाणी उपस्थित होत्या. संचालन राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भट्ट यांनी केले.साधनाताई या स्वत: खो-खो, बॅडमिंटनपटू व अथेलिट आहेत. त्यांनी शालेय जीवनात नागपूरचे कस्तुरचंद पार्क मैदान विविध क्रीडा स्पर्धांनी गाजविले. जिल्हा सेवायोजन अधिकारी स्व. मधुकरराव शिंगणे यांच्या पत्नी आहेत. त्यांचे पतीदेखील उत्कृष्ट बॅडमिंटनपटू होते.