युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी सागर कावरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 17:51 IST2018-09-17T17:51:21+5:302018-09-17T17:51:31+5:30
अकोला - युवक काँग्रेसच्या राज्यभर घेण्यात आलेल्या पक्षातंर्गत संघटनात्मक निवडणुकीत प्रदेश सचिवपदासाठी रिंगणात असलेले सागर देवेंद्र कावरे हे प्रदेश स्तरावर सचिवपदी निवडुण आले आहेत.

युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी सागर कावरे
अकोला - युवक काँग्रेसच्या राज्यभर घेण्यात आलेल्या पक्षातंर्गत संघटनात्मक निवडणुकीत प्रदेश सचिवपदासाठी रिंगणात असलेले सागर देवेंद्र कावरे हे प्रदेश स्तरावर सचिवपदी निवडुण आले आहेत. युवक काँग्रेसची निवडणुक प्रक्रीया पार पडल्यानंतर प्रदेश स्तरावरुन एक यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये सागर कावरे यांची प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आली आहे.
युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, प्रदेश महासचिव, जिल्हाध्यक्ष, जिल्हा महासचिव व विधानसभा अध्यक्ष पदासाठी राज्यभरात ९, ११ व १२ सप्टेंबर रोजी टॅबमधील एका अॅपद्वारे मतदान प्रक्रिया घेण्यात आली. यामध्ये प्रदेशाध्यक्ष पदावर सत्यजित तांबे यांची वर्णी लागली आहे. तर प्रदेश सचिवपदी सामान्य कुटुंबातील असलेले सागर देवेंद्र कावरे यांची निवड झाली आहे. अकोल्यातील शेतकरी कुटुंबातील सागर कावरे यांची प्रदेश स्तरावर निवड झाल्यानंतर त्यांनी या यशासाठी काँग्रेसच्या नेते व पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगीतले.