खेट्री(अकोला), दि. २३- चान्नी पोलीस स्टेशनांतर्गत विवराजवळ गोमांस वाहतूक करताना चान्नी पोलिसांनी २३ फेब्रुवारी रोजी सकाळी दुचाकीसह एकास रंगेहात पकडले. त्याच्याकडून २४ हजार रुपयांचा ऐवजही जप्त करण्यात आला आहे. आलेगाव येथून एमएच १९ एसी ७७७९ क्रमांकाच्या दुचाकीने विवरा येथे गोमांस विक्री करण्यासाठी येत असल्याची गुप्त माहिती ठाणेदार वैभव पाटील यांना मिळाली. त्यांनी आपले सहकारी उपनिरीक्षक पोटे, अमोल कांबळे, मनीष कोल्हट, रवी आदींनी सापळा रचून आलेगाव येथील शेख महमूद शेख लालू याला दुचाकीसह अटक केली. यामध्ये दुचाकी किंमत १५ हजार व ५५ किलो गोमांस किंमत नऊ हजार असा एकूण २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस कर्मचार्याच्या फिर्यादीवरून चान्नी पोलिसांनी आरोपी शे. महमूद शे. लालू याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक पोटे करीत आहे.
गोमांसाची विक्री; एकास अटक
By admin | Published: February 24, 2017 2:36 AM