अकोला जिल्ह्यातील चांदूर (कौलखेड परिसर) येथील शेत गट क्र. १, २ व २०९ आणि ममदाबाद ता. तेल्हारा येथील शेतीमध्ये सध्या यवतमाळ येथे राहत असलेले राजेंद्र गोपाल बेहरे यांच्या आईचा वाटा आहे. या प्रकरणात बेहरे यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, त्यांच्या आईने त्यांचे मामा बलोदे कुटुंबीयाविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला आहे. त्यामुळे बलोदे कुटुंबीयांनी शेतीतील हिस्सा देऊ, असे आश्वासन दिले. मात्र, कौलखेड येथील शेतीच्या फेरफारमध्ये नोंद करून नाव कमी केले असल्याचा आराेपही निवेदनात आहे. आईने असे फेरफारमधील नोंदीसाठी लेखी परवानगीच दिली नसतानाही फेरफार झाला असून शेतात प्लॉट पाडून विकण्यात येत आहेत. त्यामुळे आईची फसवणूक केल्याचा आराेप बेरहे यांनी केला आहे . या प्रकरणाच्या अनुषंगाने त्यांनी ममदाबाद येथील शेतीही संगनमत करून विकण्यात आली आहे. असल्याचाही आराेप केला असून त्या बाबतचे दस्ताऐवज बहेरे यांनी माहितीच्या अधिकारान्वये प्राप्त केले. या प्रकरणाची दखल घेण्यात यावी अशी मागणी करतानाच त्यांना अनाेळखी लाेकांकडून धमकी येत असल्याचेही बेहरे यांनी स्पष्ट केले आहे.
वारसदारास डावलून प्लॉटची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 4:17 AM