अकाेला : स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त गाेरक्षण रोडस्थित ग्राउंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ७५ राष्ट्रध्वजांना एकाच वेळी मानवंदना दिली. स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नी गं. भा. राधाबाई गोविंदराव देशमुख यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले.
शहीद सैनिकांच्या कुटुंबाच्या हस्ते ध्वजाराेहण झाले. यावेळी शहीद जवान आनंद गवई यांचे वडील शत्रुघ्न गवई व मातोश्री तसेच शहीद जवान विजय खाडे यांच्या मातोश्री मनकर्णाबाई तायडे व शहीद जवान संजय खंडारे यांचे वडील सुरेश खंडारे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती हाेती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्तेही ध्वजाराेहण झाले.
यावेळी काेराेना याेद्धा डाॅ. श्रेयश अग्रवाल, मारवाडी युवा मंच, तीक्ष्णगत मल्टिपर्पज सोसायटी अध्यक्ष सुगत वाघमारे व चाईल्ड लाइन टीम, ॲड. राजेश जाधव, सर्पमित्र बाळ काळणे, स्मशानभूमी कर्मचारी दीपक अरखराव, रुग्णसेवक सनी मृदूंगे, रक्तदाता विपुल माने यांचा सत्कार करण्यात आला. हा उपक्रम राहुल डोंगरे यांच्या मार्गदर्शनात आनंद (पिंटू) वानखडे मित्र परिवाराने राबविला. प्रास्ताविक आनंद (पिंटु) वानखडे, संचालन अश्वजित सिरसाट यांनी केले. आभार अमित खांडेकर यांनी मानले. उपक्रमासाठी रूपेश कामले, प्रकाश सोनोने, प्रमोद बनसोड, नीलेश गुडधे, जय इंगळे, गजानन वानखडे, राजू गवई, निशांत जाधव, सुगत तायडे, मनीष नितोने, बाळू ढोले, शरद पवार, संजय कातांगळे, ललित डिगेकर, संजय पानबुडे, प्रवीण सोनोने, आकाश धवसे, मनीष कांबळे यांनी परिश्रम घेतले.