अकोला : पुलवामा येथील दहशतवादी हल्लयात शहीद झालेल्या जवानांच्या सन्मानार्थ स्वराज्य युवा जनसेवक दल आणि झेंडा सामाजिक संघटनेच्यावतीने रविवारी अकोल्यातील अकोट फैलस्थित घुसर नाका चौकात रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरात ८५ तरुणांनी रक्तदान करुन शहीद जवानांना मानवंदना दिली.जम्मू -काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्लयात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४४ जवान शहीद झाले. शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी स्वराज्य युवा जनसेवक दल आणि झेंडा युवा सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्ममाने ३ मार्च रोजी रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबीरात ७९ युवक व ६ युवती अशा एकूण ८५ तरुणांनी रक्तदान करुन शहीद जवानांना मानवंदना दिली. रक्तदान शिबिरासाठी अकोला ब्लड बँकेचे डॉ.वैभव वायचाळ यांच्यासह चमुचे सहकार्य लाभले. यावेळी स्वराज्य युवा जनसेवक दलाचे संस्थापक अध्यक्ष सुरज इंगळे, झेंडा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मंगेश पूर्णये, विजय येलकर, मुजीफ मलिक, पूजा जवंजाळ, आकाश सावळे, केतकी चिवरकर, प्रितेश नकाशे, पूजा गोपनारायण यांच्यासह स्वराज्य युवा जनसेवक दल आणि झेंडा सामाजिक संघटनेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रक्तदानातून शहीद जवानांना मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 6:21 PM