जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सुूचनेनुसार व प्रा.आ.केंद्र अंतर्गत कार्यक्षेत्रातील आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, उपकेंद्रातील समुदाय, आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत अंगणवाडी केंद्रातील ०-६ वर्षे वयोगटातील लाभार्थीची प्रत्यक्षात वजन, उंची व आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये वयानुसार व वजनानुसार कमी असलेल्या बालकांची सॅम व मॅम असल्याची नोंद करण्यात आली. यावेळी दोन बालके मॅममध्ये आढळून आले. या बालकांच्या पालकांसमक्ष आहार,वैयक्तिक स्वच्छता बाबतीत आरोग्य शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. यावेळी स्थानिक अंगणवाडी सेविका बनसोड, आशा सेविका मीना गेडाम, आरोग्य सेविका रुपाली चारथळ, आरोग्य सेवक वैजनाथ मिसाळ, अंगणवाडी मदतनीस चिंचे यांचे सहकार्य घेऊन समुदाय आरोग्य अधिकारी शिवानी लादे आदींनी तपासणी केली. मोहीम यशस्वीतेकरीता प्रा.आ.केंद्राचे साथरोग अधिकारी संजय घाटे यांनी प्रत्येक अंगणवाडीमध्ये जाऊन पडताळणी केली.
हिवरा कोरडे येथे सॅम व मॅम बालकांची शोधमोहिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 4:33 AM