अकोला : स्थानिक जुने शहरस्थित श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात जैन धर्मियांचे महान पर्व ‘पर्युषण पर्व’ उत्साहात संपन्न झाले. या पर्वाचा समारोप श्री सम्मेद शिखरजी पूजनाने करण्यात आला. कोरोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेता दररोज आॅनलाइनद्वारे भक्तांना घरी बसूनच भगवंतांचा नित्य अभिषेक विधी व इतर पूजनाचा लाभ देण्यात आला.जैन धर्मियांमध्ये ‘पर्युषण पर्व’ म्हणजे आत्मशुद्धीचे पर्व समजल्या जाते. या पर्वात जैन भाविक उत्तम क्षमा, मार्दव, आर्जव, सत्य, शौच, संयम, तप त्याग, आकिंचन, ब्रह्मचर्य या दशधर्माचे पालन करून आत्मकल्याण साधण्याचा प्रयत्न करतात. तसेच शास्त्र वाचन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते; परंतु यावर्षी कोरोना संक्रमणाचा प्रभाव लक्षात घेता या मंदिरचे उपाध्यक्ष संदीप दिनेश उनवणे यांनी पुढाकार घेऊन भाविकांना आॅनलाइनद्वारे घरच्या घरी भगवंताचे दर्शन, पूजन, अभिषेक यांचा लाभ व्हावा म्हणून सेवा उपलब्ध करून दिली होती.७ सप्टेंबर रोजी दरवर्षीप्रमाणे श्री सम्मेद शिखरजी पूजा विधानाचे आयोजन करून पर्यूषण पर्वाचा समारोप करण्यात आला. पूजनविधीसाठी संगीता गव्हाणे यांनी कार्यभार सांभाळला. पर्यूषण पर्वाच्या यशस्तिेसाठी मंदिरचे अध्यक्ष रवींद्र उन्होने, उपाध्यक्ष संदीप उनवणे, सचिव मधुकरराव फुलंबरकर यांच्यासह महावीर गवारे, शैलेश सोनोने, नितीन फुलंबरकर, स्वप्निल जुराफे, नितीन फुरसुले यांनी परिश्रम घेतले.फोटो
जैन मंदिरमध्ये सम्मेद शिखरजी पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2020 10:48 AM