वल्लभनगर (अकोला): पतीने ग्रामपंचायतच्या कामकाजात हस्तक्षेप केल्याने सांगवी खुर्दच्या सरपंचांना अमरावती विभागीय आयुक्तांनी सदस्य पदावरून अपात्र घोषित केले आहे. प्रोसिंडिंग बुकवर लिहिल्याप्रकरणी एका सदस्यालाही विभागीय आयुक्तांनी १७ एप्रिल रोजी दिलेल्या आदेशात अपात्र ठरविले आहे. सांगवी खुर्द येथील सरपंच अंजली गावंडे यांचे पती विवेक गावंडे हे ग्रामपंचायतच्या दैनंदिन कामकाजात अधिकार नसतानाही हस्तक्षेप करीत असल्याची तसेच ग्रामसभेच्या इतवृत्तात खोडतोड केल्याने त्यांना अपात्र घोषित करण्याची मागणी रूपेश हलवणे यांनी विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली होती, तसेच ग्रामपंचायत सदस्य मदन राजू डाबेराव यांनी सभेच्या इतवृत्तावर सभा संपली, असे लिहिल्याने त्यांनाही अपात्र घोषित करण्याची मागणीही हलवणे यांनी निवेदनात केली होती. याप्रकरणी विभागीय आयुक्तांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून सांगवी खुर्दच्या सरपंच अंजली गावंडे व सदस्य मदन डाबेराव यांना सदस्य पदावरून अपात्र घोषित केले आहे.
सांगवी खुर्दच्या सरपंचांना अपात्र ठरविले!
By admin | Published: April 22, 2017 1:15 AM