शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

 संत गाडगेबाबा चषक कुस्ती स्पर्धा : मानाच्या चांदीच्या गदासाठी झुंजले मल्ल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:45 PM

अकोला: जुने शहरातील शिवाजी नगर चौक गुरुवारी सायंकाळी कुस्तीप्रेमींच्या गर्दीने फुलून गेला होता

- नीलिमा शिंगणे-जगडअकोला: जुने शहरातील शिवाजी नगर चौक गुरुवारी सायंकाळी कुस्तीप्रेमींच्या गर्दीने फुलून गेला होता. निमित्त होते श्री संत गाडगेबाबा चषक विदर्भस्तरीय कुस्ती स्पर्धेचे. यामध्ये विदर्भातील नामवंत मल्लांनी सहभाग घेतला होता. चित्तथरारक व उत्कंठापूर्ण लढती होत असल्याने कुस्तीप्रेमीच नव्हे, तर नागरिकांचे पायदेखील तेथून उचलवत नव्हते. रात्री उशिरापर्यंत स्पर्धेतील लढती झाल्या.स्पर्धेचे उद्घाटन जुन्या पिढीतील नामवंत मल्ल रमेश मोहोकार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत सावजी, जयंत सरदेशपांडे, रवींद्र गोतमारे, किशोर औतकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन व लढतींचे धावते समालोचन वस्ताद राजेंद्र गोतमारे यांनी केले. स्पर्धेत ४७ महिला आणि १२० पुरुष मल्लांनी सहभाग घेतला. पुसद, वाशिम, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, नागपूर, भंडारा आणि यजमान अकोला येथील कुस्तीगीरांचा स्पर्धेत भरणा होता. शिवाजी नगर चौकात स्पर्धा स्थळ तयार करण्यात आले होते. कुस्त्या मॅटवर खेळविण्यात आल्या. दुपारी सहभागी मल्लांची वजन व आरोग्य तपासणी करण्यात आली.महिलांच्या गटातील लढतींनी स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. ३५ किलो वजनगटात स्नेहल बमन, ४० किलो वजनगटात नालंदा दामोदर, ४५ किलो कविता राठोड, ५० किलो वजनगटात वैष्णवी कोटरवार हिने विजय मिळविला. खुल्या गटामध्ये साक्षी माळी आणि प्रेरणा अरू ळकर यांच्यात अटीतटीची लढत झाली. रोमांचक झालेल्या या लढतीमध्ये साक्षी माळीने ६-४ अशा गुणांनी विजेतेपद मिळविले. साक्षीला तीन हजार तर प्रेरणाला दीड हजार रुपये रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सर्व गटातील विजेता आणि उपविजेत्यांना रोख पारितोषिक देण्यात आले. याशिवाय नागरिकांनी खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, यासाठी वैयक्तिक रोख पारितोषिकांची लयलूट केली. पुरुषांच्या विभागातील कुमार, वरिष्ठ आणि खुल्या गटातील लढती रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. मानाची गदा कोण जिंकते, यासाठी नागरिकांमध्ये पैज लागली होती. बऱ्याच वर्षांनी अकोल्यात खुली कुस्ती स्पर्धा झाल्यामुळे जुने शहरात उत्साहाचे वातावरण पसरले होते. स्पर्धा मुख्य आयोजक राजेंद्र गोतमारे व नाना गोसावी यांच्या नेतृत्वात घेण्यात आली. स्पर्धेत पंच म्हणून महेंद्र मलिये, शिवा सिरसाट, कुणाल माधवे यांनी काम पाहिले. स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या नियमानुसार घेण्यात आली.

जुन्या पिढीतील मल्लांची सलामीअकोला हे पहिलवानांचे शहर म्हणून पूर्वी ओळख होती. आज ही ओळख धूसर होत आहे; मात्र गुरुवारी गाडगेबाबा चषक कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने जुन्या पिढीतील नामवंतांनी हजेरी लावून चांदीची गदा धरू न मैदानाला चौफेर सलामी दिली. विदर्भ केसरी नजीर पहिलवान, बंडू चांदुरकर, ओंकार मुळे, रमेश मोहकार, बंडू बुलबुले, रतन इचे, विजय नागरलकर, राजू भिरड, किशोर औतकर, रू पलाल मलिये, नारायण वाडेकर आदी पहिलवानांनी हजेरी लावून विदर्भातील नवोदित मल्लांना आशीर्वाद दिला.

 

टॅग्स :Wrestlingकुस्तीAkolaअकोला