येथील लक्ष्मीनगर स्थित श्रीसंत गजानन महाराज संस्थानच्या वतीने वर्षभर धार्मिक उत्सवांसह भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. गत मार्च महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून मंदिर बंद आहे. दरम्यान, पंरपरा खंडित होऊ नये यासाठी यावर्षी विठ्ठल महाराज धोतर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी सोहळा प्रमुख अण्णाभाऊ हगवणे व मोजक्या भाविकांसह एका वाहनातून संत गजानन महाराजांच्या मूर्तीसह पालखी सोहळा मार्गस्थ झाला. दरम्यान. येथील मंदिरात गजानन महाराजांच्या मूर्तीची पूजाअर्चा करून हा पालखी रथ रेणुकानगर, मेन रोड, जुने शहर सोपीनाथ महाराज मंदिर ते शेगावनगरीकरिता मार्गस्थ झाला. पालखी मंगळवारी बोरगाव मंजू येथील संत गजानन महाराज संस्थान लक्ष्मीनगर येथे परत येईल, अशी माहिती सेवा समितीचे डॉ. केशव काळे यांनी दिली.
फोटो:
कोरोनामुळे पायी वारी रद्द
गत मार्च महिन्यापासून कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर संसर्ग होऊ नये म्हणून धार्मिक उत्सव बंद आहेत. पायी वारीही रद्द करण्यात आली आहे. मात्र पालखीची पंरपरा खंडित होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून सोमवारी मोजक्या भाविकांसह पालखी शेगावी रवाना झाली.