ठळक मुद्देमहिला गटाचे जेतेपद हरयाणाकडे; पुजारानी व अशोक उत्कृष्ट खेळाडू
नीलिमा शिंगणे-जगड लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : खासदार चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सर्मथ क्रीडा मंडळ अमरावतीने महाराष्ट्र पोलीस संघ मुंबईवर मात करून खासदार चषकावर ताबा मिळविला. हनुमान क्रीडा मंडळ कबड्डी स्टेडियम केळीवेळीत रविवारी सायंकाळी हा सामना खेळण्यात आला. अमरावतीने हा सामना ४३-३८ अशा गुणांनी जिंकला.
महिला गटातील अंतिम सामना सुवर्ण युग पुणे व गुरुकुल हरयाणा संघात झाला. हरयाणाने सामन्यावर १६-३१ गुणांनी वर्चस्व निर्माण करून जेतेपद पटकाविले. हरयाणाची पुजारानीने १३ गुण आणि तीन बोनस गुण मिळविले. पुजारानीने या स्पर्धेचा वुमेन ऑफ दि सिरीज खिताब पटकविला.महिला गटात तिसर्या स्थानी महाराष्ट्र महिला पोलीस संघ व चतुर्थ स्थानी जय हनुमान कोल्हापूर संघ राहिला. पुरुषाच्या गटाचे तिसरे स्थान साई सोनीपत हरयाणा, तर चतुर्थ स्थान एम. डी. बॉईज मुंबई संघाने पटकाविले. स्पर्धेत रुपाली गोडबोले, आसावरी बोचरे, सूर्या, स्वाती खंडारे, पुजारानी, तर पुरुषांच्या गटामध्ये अशोक, देवेंद्र कदम, लारा, महेश मुकदम यांनी उत्कृष्ट खेळप्रदर्शन करीत विविध पुरस्कार प्राप्त केले.
पाऊसही थांबला!पुरुष गटाचा अंतिम सामना पावसामुळे होणार की नाही, अशी भीती आयोजकांना वाटत होती. परंतु, सामना संपल्यानंतर बक्षीस वितरण सुरू असताना पावसाने मैदानात हजेरी लावली.