-संजय उमकमूर्तिजापूर : तालुक्यात ९७ टक्के पेरणी झाली आहे, यावर्षी पीक परिस्थिती समाधानकार असून आंतरमशागतीच्या कामाने वेग घेतला आहे. काही भागात नदी काठावरील गावातील शेतीत पुराचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, याचा अंतिम अहवाल प्राप्त झाला आहे. तालुक्यात ७२ हजार ६९८ पेरणी लक्षांक होता जवळपास हा लक्षांक पुर्ण झाला असून ७ हजार ५२६ हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी करण्यात आली. यातील अतिवृष्टीमुळे व नदी काठावर असलेल्या शेतजमीनत पुराचे पाणी शिरल्याने शेती खरडून गेल्याने ७० गावातील ६३१.१५ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. यात १ हजार ७०४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ३३ टक्क्याच्या वर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून हेक्टरी ६ हजार ८०० रुपये मदत मिळणार असल्याची माहिती आहे. यासाठी ४३ लाख १ हजार २०० रुपये एवढा निधी अपेक्षित आहे याचा अंतिम अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला असल्याने शेतकऱ्यांना येत्या काळात नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कपाशी पेरा ११ हजार ६३५ हेक्टर होता त्या पेक्षा यावर्षी कपाशी पेऱ्यात निम्म्याने घट झाल्याने तो केवळ ६ हजार ८७२ हेक्टरवर आला आहे. तर सोयाबीनची गतवर्षी ४३ हजार ८४० हेक्टरवर पेरणी झाली होती यावर्षी ती ४७ हजार १७७ हेक्टर झाली असल्याने त्या ३ हजार हेक्टर पेक्षा जास्त प्रमाणात वाढ झाली आहे. जुन - जुलै महिन्यात पावसाने सरासरी ओलांडली असून या महिन्यात ४६२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, सरासरीपेक्षा १२४ टक्के पाऊस झाला आहे. तालुक्यातील पीक परिस्थिती समाधानकार असून १५ जून दरम्यान पेरणी झालेले सोयाबीन पोपट व फुलोरावस्थेत आहे,तर कपाशीला पाते पकडले आहे.असा आहे पीक पेरातुर ११ हजर १५६ हेक्टर, उडीद १ हजार २४१ हेक्टर, मुग ३ हजार ७२० हेक्टर, ऊस, ११.४ हेक्टर, तीळ १३ हेक्टर, सोयाबीन ४७ हजार १७७ हेक्टर कापूस ६ हजार ८७२ हेक्टर
फळ पीके सोडून झालेले नुकसान
फळ पीके सोडून जिरायती पीकाचे ६८ गावात नुकसान झाले. सोयाबीन ४६०.६७ हेक्टर, तुर ६४.९९ हेक्टर, कापूस ७३.३४ हेक्टर, मुग १२.५५ हेक्टर, उडीद १८ हेक्टर, तीळ.२० हेक्टर अशा ६२९.७५ हेक्टर जमिनीवरील पीकाचे नुकसान झाले आहे.
सद्यस्थितीत सोयाबीनवर उंट अळी तंबाखूचे पाने खाणारी अळी, चक्रीभुंगा या सारख्या किटकनाशकांचा प्रश्नदुर्भाव आहे. निरिक्षणे घेऊन किटकनाशकांचा वापर करावा, पोपट अवस्थेत २ टक्के सल्फरची फवारणी करावी, पाते असलेल्या कपाशीवर निंबोळी अर्क फवारणी करणे आवश्यक आहे, भविष्यात बोंडअळी टाळण्यासाठी अनावश्यक टॉनिक फवारणी टाळावी. अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त जमीनीचे सर्वेक्षण झाले आहे व त्याचा अंतिम अहवाल प्राप्त झाला आहे-अमृता काळे, तालुका कृषी अधिकारी, मूर्तिजापूरजुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे तालुक्यातील फळबाग वगळता ६८ गावातील ६३१.१५ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. यात १ हजार ७०४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. शासनान हेक्टरी मदत जाहीर करेल ती एकाच दिवसात शेतकरी बांधवांना वितरीत करण्यात येईल. -प्रदीप पवार, तहसीलदार, मूर्तिजापूर