कृषी कायद्याविरोधात काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 04:25 PM2020-10-31T16:25:40+5:302020-10-31T16:25:48+5:30
Congress Agitation At Akola एक दिवसीय सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
अकोला : केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात शहर काँग्रेस कमिटी तर्फे एक दिवसीय सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी इंदिराजी गांधी आणि सरदार वल्लभ भाई पटेल यांना आदरांजली वाहण्यात आली. स्थानिक रतनलाल प्लॉट चौक येथे झालेल्या कार्यक्रमात शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आ. बबनराव चौधरी, माजी मंत्री अजहर हुसेन, प्रा. राजाभाऊ देशमुख, अब्दुल जब्बार, डॉ. सुभाष कोरपे, कपिल रावदेव, निखिलेश दिवेकर, राजेश राऊत, विजय शर्मा, राजेश पाटील, ऍड. इकबाल सिद्धीकी, नगरसेवक पराग कांबळे, सुरेश ढाकोलकर, आकाश कवडे, अंशुमन देशमुख, विठ्ठलराव मोहिते,डॉ. प्रशांत वानखडे, महेंद्र गवई, आकोश सायखेडे, विश्वनाथ पारधी, राजेश पाटील मते,हनीफ भाई, पंकज देशमुख, सागर कावरे, आकाश शिरसाट, इस्माईल टीव्हीवाले, तश्वर पटेल, खिजर खान, विजयाताई राजपूत, मो. युसूफ,अंकुश पाटील, राहूल सारवान, संजय मेश्रामकर, अशोकराव अमानकर, विशाल इंगळे, अतुल अमानकर, जनार्दन बुटे, डॉ. शफिक अहमद, गणेश बोचरे, जय वाठुरकर, अभिजित तवर,विलास देशमुख, रफिक लाखानी, श्याम ढाकरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.