-------------------------
गणगणे विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती
अकोट : स्थानिक लक्ष्मीबाई गणगणे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून नरसिंग महाविद्यालयाच्या प्रा.डॉ. बबिताताई हजारे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका अर्चना गणगणे यांची उपस्थिती होती. (फोटो)
------------------------
हिवरखेड येथे ज्ञानेश्वरी परायणाची सांगता
हिवरखेड : येथील विठ्ठल-रुखमाई मंदिरात ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता करण्यात आली. यावेळी अन्नपूर्णा विश्वनाथ बोंबटकार या महिलेने मंदिराला एक लाख अकरा रुपयांची देणगी दिली. येथील मठाधीश रामायणाचार्य वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाघ यांच्या हस्ते देणगीची पावती देण्यात आली. (फोटो)
------------------
चिखलगावात अवकाळी पावसाची हजेरी
चिखलगाव : गेल्या दोन दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण असल्यामुळे शेतकरी चिंतित झाला आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती. ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात सापडली आहेत.
--------------------------
आगर येथे शौर्यदिन उत्सवात साजरा
आगर : येथील विश्वशांती बुद्धविहारात शौर्यदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमात सुरुवातीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान बुद्ध व महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी माणीक शिरसाट, श्रावण शिरसाट, अनिल शिरसाट, राजेश शिरसाट आदी उपस्थित होते.
--------------------------
पुलाला कठडे नसल्याने अपघाताची भीती
बोरगाव मंजू : परिसरातील घुसर-खरप बु. रस्त्यावरील पुलाला कठडे नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. या रस्त्याचे काम पू्र्ण झाल्याने या मार्गावरून वाहनांची मोठ्या संख्येने वर्दळ असते. त्यामुळे पुलाला कठडे बसविण्याची मागणी होत आहे.
--------------------------