काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असून, या काळात रक्तपेढ्यांमध्ये रक्तदानाचा तुटवडा निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेता बँक ऑफिसर असाेसिएशनच्यावतीने सामाजिक दायित्वाच्या भावनेतून रक्तदान शिबिराचे आयोजन केले हाेते. दरवर्षी इतरही सामाजिक उपक्रम राबविले जातात. दरम्यान, याप्रसंगी सर्व रक्तदात्यांना क्षेत्रीय प्रबंधक श्रीआंशू साहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. रक्तदात्यांचे स्वागत असाेसिएशनचे क्षेत्रीय काेषाध्यक्ष पराग देशमुख व बँकेचे मुख्य प्रबंधक आशुतोष नाईक यांनी केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी अकोला युनिटचे अमोल शेरेकर, आशिष दिनोरे, मुकेश कदम, विशाल ठाकरे, विलास पाटील यांनी सहकार्य केले. यावेळी स्टेट बँकेचे सर्वश्री अनुप टापरे, राहुल बाभूळकर, सत्यजित पांडे, नितीन दांदळे, मुकेश कदम, अमित ठाकरे, आनंद शिंदे, गजानन गावंडे, जयेश मंसेठा, आशिष दिनोरे, दीपक विरोकर, विलास पाटील, रोशन मानापुरे, योगेश गाडगीळ, श्रीकांत घोरमारे, अमोल शेरेकर, श्रीकांत खडसे, गजानन दहलके, सनथ दानोले, दिनेश बागुल, संतोष सोनोने, सचिन सपकाळ यांसह इतरांनी रक्तदान करून समाजाप्रती बांधीलकी व्यक्त केली.
स्थापना दिनानिमित्त एसबीआयचे रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2021 4:13 AM