अकोला: महापालिकेच्या शिक्षण विभागाची आस्थापना तसेच अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या कमी झालेल्या पटसंख्येवर तीव्र नाराजी व्यक्त करीत अनुसूचित जाती-जमातीचे अध्यक्ष विजय कांबळे यांनी शिक्षण विभागाच्या कामकाजावर ताशेरे ओढले. यावेळी रिक्त पदांचा अनुशेष व त्यासंदर्भात शासनाचे दिशानिर्देश आदी मुद्यांवर मनपा प्रशासनाने सादर केलेल्या कामकाजावर आयोगाने समाधान व्यक्त केले.राज्य शासनाच्यावतीने अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष विजय कांबळे यांच्यासह मधुकर गायकवाड, रमेश शिंदे यांनी शुक्रवारी सकाळी मनपाच्या मुख्य सभागृहात प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला. आयोगातील सदस्यांनी मनपाकडे प्रश्नावली दिली होती. सदर प्रश्नावलीमध्ये सामान्य प्रशासन विभागाने योग्यरीत्या माहिती नमूद केल्याचे आयोगाने स्पष्ट केले. मनपा कर्मचाऱ्यांची एकूण पदे, त्यांची पदोन्नती, सरळसेवेद्वारे केली जाणारी पदभरती तसेच अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील रिक्त पदांच्या अनुशेषावर आयोगाचे अध्यक्ष विजय कांबळे यांनी विचारणा केली असता, पदोन्नती व सरळसेवेद्वारे होणाºया पदभरतीबाबत राज्य शासन निर्देशानुसार कामकाज सुरू असल्याचे प्रशासनाने नमूद केले. प्रवर्गनिहाय कर्मचाºयांची संख्या व पदोन्नतीसंदर्भात मनपाची भूमिका पाहता अनुशेष जास्त प्रमाणात नसल्याचे दिसून आले. यावेळी मनपा उपायुक्त सुमंत मोरे, मुख्य लेखाधिकारी परमजित गोरेगावकर, सहायक आयुक्त डॉ. दीपाली भोसले, पूनम कळंबे, नगर सचिव अनिल बिडवे, क्षेत्रीय अधिकारी राजेंद्र घनबहादूर, वासुदेव वाघाडकर, कार्यकारी अभियंता अजय गुजर, स्वच्छता व आरोग्य विभागाचे अधीक्षक प्रशांत राजूरकर, वसंत मोहोकार, राजेंद्र गोतमारे, शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना, विद्युत विभाग प्रमुख अमोल डोईफोडे, दिलीप जाधव यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते.विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे किती?शिक्षण विभागाची आस्थापना व मनपा शाळेत अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या घटत्या पटसंख्येवर आयोगाने ताशेरे आढेले. शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना ‘एससी-एसटी’ प्रवर्गातील विद्यार्थ्यांची नेमकी आकडेवारी सादर करू शकत नसल्याचे पाहून आयोगाने नाराजी व्यक्त केली. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा मनपा शाळेच्या तुलनेत खासगी शाळांकडे ओढा वाढत चालल्याचे निदर्शनास आल्यानंतर दर्जेदार शिक्षणासाठी उपाययोजना राबविण्याचे निर्देश आयोगाने दिले.कर्मचारी संघटनांनी दिले निवेदन!कर्मचाºयांच्या पदोन्नतीसंदर्भात अकोला म्युनिसिपल मजदूर युनियनच्यावतीने कार्याध्यक्ष विठ्ठल देवकते, संजय कथले यांनी तसेच सफाई कर्मचाºयांच्यावतीने पी.बी. भातकुले, अनुप खरारे, शांताराम निंधाने, विजय सारवान, हरिभाऊ खोडे, धनराज सत्याल, मदन धनजे, रमेश गोडाले, सोनू पचेरवाल यांनी आयोगाकडे निवेदन सादर केले.महापौरांनी केले स्वागतमनपात आयोगाचे अध्यक्ष विजय कांबळे, मधुकर गायकवाड, रमेश शिंदे यांचे आगमन झाल्यानंतर महापौर विजय अग्रवाल यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मनपाचा आस्थापना खर्च वाढल्यामुळे रिक्त पदांचा अनुशेष दूर करताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने यावर शासनाने निर्णय घेण्याची सूचना महापौर अग्रवाल यांनी केली. यांसह विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.