अकोला: अति पावसामुळे पिके पिवळी पडू लागली असून, पिकांना जगविण्यासाठी युरिया खताची मागणी वाढली आहे; मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात युरिया खताचा तुटवडा निर्माण झाल्याने, ह्ययुरियाह्णसाठी शेतकर्यांना हेलपाटे सहन करावे लागत आहेत. त्यानुषंगाने खतसाठा बाजारात उपलब्ध होण्याची प्रतीक्षा शेतकर्यांकडून केली जात आहे.गेल्या महिनाभरापासून अधून-मधून पाऊस हजेरी लावत आहे; तसेच गेल्या ७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात अतवृष्टी झाली. त्यामुळे शेतांमध्ये पावसाचे पाणी साचले असून, जिल्ह्यात सोयाबीन, कपाशी व इतर पिके पिवळी पडू लागली आहेत. पिवळ्या पडणार्या पिकांसाठी आवश्यक असलेल्या ह्ययुरियाह्ण खतासाठी शेतकर्यांकडून मागणी वाढली आहे. युरिया खताची मागणी वाढली असली तरी, त्या तुलनेत गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून जिल्ह्यात युरिया खताचा पुरवठा होत नसल्याने, जिल्ह्यात युरियाचा तुटवडा निर्माण झाला आहे. गेल्या ७ ते १३ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात केवळ १ हजार २00 मेट्रिक टन युरिया खतसाठा राष्ट्रीय केमिकल्स अँन्ड फर्टिलायझर्स (आरसीएफ) कंपनीकडून प्राप्त झाला. उपलब्ध झालेला हा खतसाठा संपुष्टात आला आहे. बाजारात खतसाठा उपलब्ध नसल्याने, युरिया खत घेण्यासाठी बाजारात येणार्या शेतकर्यांना खत मिळत नसल्याने, आल्या पावलीच परतावे लागत आहे. त्यामुळे युरिया खताचा तुटवडा निर्माण झाल्याच्या पृष्ठभूमीवर पिवळे पडणार्या पिकांना जगविण्यासाठी युरिया खतसाठा बाजारात केव्हा उपलब्ध होणार, याबाबतची प्रतीक्षा शेतकर्यांकडून केली जात आहे.
‘युरिया’चा तुटवडा; शेतकर्यांना हेलपाटे
By admin | Published: September 14, 2014 1:39 AM